Chakka Jam: शेतकऱ्यांसह दिल्ली पोलिसही चक्का जामसाठी सज्ज

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

राजधानी दिल्लीत या चक्का जामचा काहीच परिणाम होणार नाही असे शेतकऱ्यांनी जाहीर केले असूनही दिल्लीत कडक सुरक्षा बंदोबस्त केला आहे.

नवी दिल्ली: दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून शेतकरी केंद्राच्या तीन कृषी कायद्याचा निषेध करत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रॅक्टर परेडनंतर आता संघटनांनी शेतकरी आंदोलनाला आणखी एक वळण प्राप्त झाले आहे आज देशव्यापी चक्का जाम जाहीर केला आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला काँग्रेससह अनेक पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. शेतकर्‍यांनी चक्का जाम जाहीर केल्याबरोबर दिल्ली  पूर्णपणे कॅन्टोन्मेंटमध्ये बदलली आहे. ट्रॅक्टर रॅलीच्या घटनेचा धडा घेत दिल्लीत पुर्णपणे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही सुरक्षा चोवीस तास असणार आहे.

राजधानी दिल्लीत या चक्का जामचा काहीच परिणाम होणार नाही असे शेतकऱ्यांनी जाहीर केले असूनही दिल्लीत कडक सुरक्षा बंदोबस्त केला आहे. आज दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वाहतुकीची कोंडी होणार नाही, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे. तीन तासासाठी  देशातील काही महत्वाच्या भागातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर शेतकरी शांततेत चक्का जाम करणार असल्याचे आदोलक कर्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान दिल्ली पोलिसांनी सुरक्षीततेची कोणत्याही प्रकारची कसर सोडली नाही. 

किसाब चक्का जाम 
शेतकर्‍यांचा चक्का जाम लक्षात घेता दिल्ली एनसीआरमध्ये 50 हजाराहून अधिक दिल्ली पोलिस, निमलष्करी दल आणि राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. इतकेच नाही तर दरवाजे बंद करण्यासाठी किंवा उघडण्यासाठी किमान 12 मेट्रो स्थानकांना सतर्क केले गेले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. आजचा चक्का जाम यशस्वी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे. दिल्ली-गाझीपूर सीमेवर व्यापक बॅरिकेडिंग उपाययोजना करण्यात आल्या आहेत, ते शेतकरी संघटनांद्वारे संभाव्य संघटनांचा सामना करण्यास तयार आहेत.

चीनच्या मदतीने पाकिस्तान होणार आधुनिक शस्त्रांनी सज्ज -

दिल्लीत कृषी कायद्याच्या विरोधात असलेल्या शेतकरी संघटनेच्या 'चक्का जाम' साठी सुरक्षा अधिक कडक केली गेली आहे. आयटीओ क्षेत्रात पोलिस बैरिकेड वर काटेरी तार बसविण्यात आले आहेत. शेतकरी दिल्लीत चाक जाम करणार नाही. शेतकऱ्यांनी दिल्लीत चक्का जाम न करण्याची घोषणा करूनही दिल्ली पोलिस कोणत्याही प्रकारचा विश्वास दाखवायला तयार नाही. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दिल्ली पोलिस पुर्णपणे सज्ज आहे. आयटीओ वर पैरामिलिट्री  दलाचे जवान तैनात करण्यात आले आहे. सीमेवर मजबूत बॅरिकेट केले गेले आहे.

गोव्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

संबंधित बातम्या