'ही' राज्ये सोडून होणार देशभरात शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

दिल्ली या केंद्रशासीत प्रदेशासंह उत्तरप्रदेश, उत्तराखंड या राज्यात शेतकऱ्यांचा चक्का जाम  आंदोलन  होणार नसल्याचं शेतकरी नेते राकेश  टिकैत  यांनी  सांगितले आहे.

नवी दिल्ली: गेल्या तीन महिन्यांपासून केंद्रसरकारने बनवलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार आणि शेतकरी नेते यांच्यात कृषी कायद्यांच्या संदर्भात अनेक वेळा चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. मात्र अद्याप तरी कोणत्याही प्रकारचा तोडगा निघू शकला नाही. उद्या देशभरात शेतकऱ्यांकडून कृषी कायद्याच्या विरोधात चक्का जाम आंदोलन होणार आहे. मात्र दिल्ली या केंद्रशासीत प्रदेशासंह उत्तरप्रदेश, उत्तराखंड या राज्यात शेतकऱ्यांचा चक्का जाम  आंदोलन  होणार नसल्याचं शेतकरी नेते राकेश  टिकैत  यांनी  सांगितले आहे.

ही माहिती देताना शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले, ''जी लोकं आंदोलनाच्या ठिकाणी येऊ शकणार नाही, ते शांततेत आपआपल्या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करतील. मात्र दिल्लीत हे आंदोलन होणार नाही. दिल्ली सोडून देशभरातील रस्ते बंद करण्यात येतील.''

कंगना आणि अर्णब देशभक्त ; शेतकरी देशद्रोही? संजय राऊतांचं टिकास्त्र

यापूर्वी शेतकरी नेत्यांनी चक्का जाम आंदोलनाची कल्पना दिली होती. शेतकऱ्यांनी रस्त्यावर बसून कृषी कायद्यांच्या बाबतीत आपला सहभाग नोंदवतील. आणि त्यानंतर तीन तासाचा अवधी संपल्यानंतर आपआपल्या भागातील अधिकाऱ्यांना निवेदने देतील. तर दुसरीकडे या साऱ्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे म्हणने आहे की, उद्या होणाऱ्या चक्का जाम आंदोलनाच्य़ा संदर्भात कोणत्याही शेतकरी नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधलेला नाही.

Farmer Protest: शेतकरी आंदोलनावर अमेरिकेने दिला भारताला 'हा' सल्ला

कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ देशातून तसेच परदेशातून पांठिबा मिळत आहे. तर संसदेत विरोधी पक्षांनी कृषी कायद्यावरुन सराकारवर हल्लाबोल सुरु केला आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे लवकरात लवकर रद्द करावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून  करण्यात येत आहे. अमेरिकेच्या नवनिर्वाचीत उपाध्यक्षा कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस, अंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरणासाठी काम करणारी ग्रेटा थ्रेनबर्ग, पॉपस्टार रिहाना यांनी कृषी कायद्याला आपला पाठिंबा दर्शवला आहे.    

संबंधित बातम्या