प्रार्थनास्थळे कायद्यातील तरतूदींना सर्वोच्च न्यायालयात आव्हान

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

प्रार्थनास्थळे कायदा, १९९१ च्या कायद्यातील काही तरतुदींच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : प्रार्थनास्थळे कायदा, १९९१ च्या कायद्यातील काही तरतुदींच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या तरतुदींनुसार, १५ ऑगस्ट १९४७ रोजी अस्तित्वात असलेल्या प्रार्थनास्थळांवर हक्क सांगण्यास किंवा त्यांच्या स्वरुपात बदल करण्यास मनाई आहे. या कायद्यातील कलम २,३ आणि ४ रद्द करावेत, अशी याचिकेत मागणी करण्यात आली आहे. भाजप नेते अश्‍विनी उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे.   

संबंधित बातम्या