Chandigarh University MMS स्कँडलवर अरविंद केजरीवाल म्हणाले...

दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईल, असे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले.

Delhi Chief Minister Arvind Kejriwal
Delhi Chief Minister Arvind KejriwalDainik Gomantak

Chandigarh University Latest News: पंजाबमधील मोहाली येथे असलेल्या चंदीगड विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने कथितपणे सहकारी विद्यार्थिनींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड करुन ते शिमल्यातील एका तरुणाला पाठवले आणि या तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट केले. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून आरोपी विद्यार्थ्याला अटक केली असून आरोपी तरुणाचा शोध सुरु आहे. चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचा कथित एमएमएस व्हायरल झाल्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईल, असे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले.

मुख्यमंत्री केजरीवाल यांची प्रतिक्रिया

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी ट्विट करत म्हटले की, 'चंदिगड विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने अनेक विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करुन व्हायरल केले आहेत. हे अतिशय गंभीर आणि लज्जास्पद आहे. यामध्ये सहभागी असलेल्या सर्व दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईल. पीडित मुलींनी हिंमत बाळागावी. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत.'

आत्महत्येचा प्रयत्न केला नाही

चंदीगड विद्यापीठ एमएमएस प्रकरणावर, मोहालीचे एसएसपी विवेक सोनी म्हणाले की, 'आत्महत्येचा प्रयत्न किंवा मृत्यू झाला नाही. रुग्णवाहिकेत नेण्यात आलेल्या विद्यार्थिनी चिंताग्रस्त होत्या. आमची टीम त्यांच्या संपर्कात आहे. एका विद्यार्थींनीचा (Students) व्हिडीओ सोडला तर दुसरा कोणताही व्हिडिओ आमच्या निदर्शनास आलेला नाही.'

दुसरीकडे, मोहालीचे एसएसपी विवेक सोनी पुढे म्हणाले की, 'आमच्या तपासात आरोपी विद्यार्थिनीचा एकच व्हिडिओ तिच्या मोबाईलमध्ये सापडला आहे. अन्य कोणत्याही विद्यार्थीनीचा व्हिडिओ मिळालेला नाही. उर्वरित इलेक्ट्रॉनिक डिवाइस ताब्यात घेण्यात आली आहेत. त्यांना फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com