Chandrayaan-3 New Video: इतिहास घडायला काही अवधी बाकी... ISRO ने जारी केला नवा VIDEO

Chandrayaan-3: भारताच्या मून मिशनसाठी आणखी एक मैलाचा दगड ठरवताना, इस्रोने मंगळवारी चांद्रयान-3 ने घेतलेल्या चंद्राच्या प्रतिमांचा एक नवीन व्हिडिओ जारी केला.
Chandrayaan-3
Chandrayaan-3 Dainik Gomantak

Chandrayaan-3: भारताच्या मून मिशनसाठी आणखी एक मैलाचा दगड ठरवताना, इस्रोने मंगळवारी चांद्रयान-3 ने घेतलेल्या चंद्राच्या प्रतिमांचा एक नवीन व्हिडिओ जारी केला.

चांद्रयान-3 लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या एक दिवस आधी, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने मंगळवारी सांगितले की, लॅंडर चंद्राच्या दिशेने आगेकूच करत आहे.

दरम्यान, इस्रोने (ISRO) सांगितले की, “लॅंडर चंद्राच्या दिशेने आगेकूच करत आहे. ऑपरेशन्स सुरळीत सुरु आहे,” ते पुढे म्हणाले की, MOX/ISTRAC वरुन चांद्रयान-3 चे चंद्रावरील लँडिंगचे थेट प्रक्षेपण बुधवारी संध्याकाळी 5.20 वाजल्यापासून सुरु केले जाईल.

लँडर (विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) यांचा समावेश असलेले लँडर मॉड्यूल बुधवारी संध्याकाळी 6.45 वाजता चंद्राच्या पृष्ठभागाच्या दक्षिण ध्रुवीय क्षेत्राजवळ उतरणे अपेक्षित आहे.

Chandrayaan-3
Chandrayaan-3 Landing Date: चांद्रयान-३ चे लँडिंग लांबणार! इस्रो काय म्हणाले?

यापूर्वी, 19 ऑगस्ट रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) चांद्रयान-3 मोहिमेच्या 'लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेरा' (NPDC) ने सुमारे 70 किमी उंचीवरुन घेतलेली चंद्राची छायाचित्रे प्रसिद्ध केली होती.

इस्रोने म्हटले आहे की, LPDC कडून घेतलेली छायाचित्रे मिशनच्या लँडर मॉड्यूलला (LM) त्याचे स्थान (अक्षांश आणि रेखांश) निर्धारित करण्यात मदत करतात. बुधवारी LM चंद्राच्या पृष्ठभागावर 'सॉफ्ट लँडिंग' करेल अशी अपेक्षा आहे.

इस्रोने सोमवारी 'लँडर हॅझार्ड डिटेक्शन अँड एव्हिडन्स कॅमेरा' (LHDAC) मधून घेतलेली चंद्राच्या दूरच्या बाजूची छायाचित्रे प्रसिद्ध केली.

अहमदाबादस्थित (Ahmedabad) 'स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटर' (SAC) ने विकसित केलेला हा कॅमेरा सुरक्षित 'लँडिंग' क्षेत्र शोधण्यात मदत करतो, जिथे खडक किंवा खोल खंदक नाहीत. SAC हे इस्रोचे मुख्य संशोधन आणि विकास केंद्र आहे.

Chandrayaan-3
Chandrayaan-3: चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगनंतर भारताची ताकद वाढणार, 'या' फायद्यासंह...

इस्रोच्या म्हणण्यानुसार, चांद्रयान-3 मोहिमेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी लँडरमध्ये LHDAC सारखी प्रगत टेक्नॉलॉजी आहे. चांद्रयान-2 अयशस्वी झाल्यानंतर 14 जुलै रोजी चांद्रयान-3 प्रक्षेपित करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com