जम्मू-काश्‍मीरमध्ये जमीन कायद्यात बदल

जम्मू-काश्‍मीरमध्ये जमीन कायद्यात बदल
Changes in land law in Jammu and Kashmir


नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज ‘केंद्रशासित जम्मू-काश्‍मीर पुनर्रचना (केंद्रीय कायद्यांचा स्वीकार) तिसरा आदेश, २०२०’ अशी अधिसूचना जारी करत जम्मू आणि काश्‍मीर तसेच, लडाखमध्ये कोणत्याही भारतीयाला जमीन खरेदी करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. सरकारने जम्मू काश्‍मीरमधील २६ कायदे रद्द केले आहेत अथवा त्यात बदल केला आहे. या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करण्यात आली आहे.  


गेल्या वर्षी जम्मू-काश्‍मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यावर केंद्र सरकारने आता येथे उर्वरित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू असलेले केंद्रीय कायदे लागू करण्यास सुरुवात केली आहे.
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com