घरी बसून करता येणार आधारमध्ये बदल; mAadhaar App जाणून घ्या

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जून 2021

आपल्या फोनमध्ये  mAadhaar App अपडेट करा किंवा डाऊनलोड करा.

भारतात (India) आधार कार्ड (Aadhaar card) हे अनिवार्य झाले आहे. खासगी कामे असो किंवा सरकारी आधार कार्ड आजच्या काळाच आवश्यक झाले आहे. बॅंकेत खाते (Bank account) उघडायचे असेल किंवा सिमकार्ड खरेदी करायचे असेल, या सगळ्या कामांसाठी आता आधारकार्ड आवश्यक बनले आहे. अनेक सरकारी योजनांचा (government schemes) फायदा घेण्यासाठी देखील आधार आवश्यक आहे. तसेच ओळख पटवण्यासाठी देखील आधार कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर केला केला जातो. आधार कार्डमध्ये त्रुटी असल्यास अनेक महत्त्वपूर्ण कामे अडकली जाऊ शकतात. आपल्यालाही अशा प्रकारच्या समस्या येत असतील आणि कार्यालयामध्ये जाण्याचा कंटाळा आला असेल तर आता तुम्हीही घरी बसून आपल्या समस्यांचे  निराकरण करु शकता. यासाठी आपल्या फोनमध्ये  mAadhaar App अपडेट करा किंवा डाऊनलोड करा. (Changes in support that can be done sitting at home Learn mAadhaar App)

UIDAI ने mAadhaar App अलीकडेच नवीन अपडेट सादर केले आहे. ज्यामधून यापुढे आपल्याला बऱ्याच गोष्टींचा फायदा घेऊ शकता. हे अ‍ॅप 
डाऊनलोड करताना मात्र बनावट अ‍ॅप पासून सावधान राहणे आवश्यक आहे. त्याचबरोबर हे अ‍ॅप UIDAI जाहीर केलेल्या अधिकृत लिंकवरुनचं डाऊनलोड करा.

डिजिटल नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न; ट्विटरचे आश्वासन

mAadhaar जाणून घ्या
mAadhaar अ‍ॅपद्वारे आपण आपल्या मोबाईलवर आधारची कॉपी डाऊनलोड करु शकता.
2 mAadhaar अ‍ॅपमध्ये Aadhaar री-प्रिंटचे ऑप्शन देखील देण्यात आला आहे.
या अ‍ॅपद्वारे, आपणास आवश्यक असल्यास ऑफलाइन मोडमध्ये आधारकार्ड दाखवू शकतो. आधार एक प्रकारे आपले ओळखपत्र म्हणून काम करेल. म्हणून आपल्या आधारची कोणत्याही स्वरुपाची प्रत संपूर्ण वेळ सोबत ठेवण्याची यापुढे आवश्यकता नाही.
3 या अ‍ॅपमध्ये आपल्याला कोणत्याही कागदपत्रांविषयी पत्ता देखील अपडेट करता येणार आहे.
4 कुटुंबातील पाच सदस्यांचे आधार या अ‍ॅपमध्ये ठेवता येणार आहे. 
या अ‍ॅपद्वारे आधार वापरकर्ता कधीही स्वता:चा UID किंवा आधार क्रमांक लॉक किंवा अनलॉक करता येणार आहे.
5 सुरक्षा लक्षात घेता हे फिचर  मोबाईल अ‍ॅप स्वरुपात देण्यात आले आहे. कारण बायोमेट्रीक डेटा आधारकार्डशी जोडण्यात आला असून तो फार महत्त्वाचा आहे. तसेच या या अ‍ॅपमध्ये देण्यात आलेल्या बायोमेट्रीक लॉकिंग पध्दतीचा वापर करुन आधार लॉक होईल आणि आपण तो अनलॉक करेपर्यंत त्याचा वापर येणार नाही.
6 या अ‍ॅपद्वारे ईकेवायसी डेटा आणि क्यूआर कोड करण्यात येऊ शकतो. 
या अ‍ॅपद्वारे तुम्हाला नजीकच्या आधार नोंदणी केंद्राची माहिती देखील सहज मिळू शकते.
 

संबंधित बातम्या