चारधाम यात्रेला परवानगी, वाचा कोण जाऊ शकेल?

चारधाम यात्रेला परवानगी, वाचा कोण जाऊ शकेल?
CHAR DHAM.jpg

देशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना अनेक राज्यांमध्ये अनलॉकच्या (unlocked) प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे कोरोना परिस्थिती पाहता टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल केले जात आहेत. सरकारने उत्तराखंडमधील (Uttarakhand) चार धाम यात्रा (Char Dham Yatra) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल (Subodh Uniyal) यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. तसेच कोरोना परिस्थिती लक्षात घेता राज्यात पुन्हा एकदा 22 जूनपर्यंत कर्फ्यू (curfew) ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजता संचारबंदीचा कालावधी संपेल, असे उनियाल यांनी सांगितले आहे. (Chardham Yatra allowed read Who can go)

उनियाल पुढे म्हणाले, संचारबंदीच्या कालावधीमध्ये जुन्या प्रमाणित कार्यप्रणाली काही बदलासंह कायम राहतील. ज्या जिल्ह्यांमध्ये चारधाम आहेत, त्या जिल्ह्यातील रहिवाश्यांना निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी (Negative RTPCR) अहवालासंह मंदीरामध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. निगेटिव्ह आरटीपीसीआर अहवालामुळे चमोली (Chamoli) जिल्हयातील रहिवासी धाम,(Dham) बद्रीनाथ (Badrinath) रुद्रप्रयाग (Rudraprayag) जिल्ह्यातील केदरनाथ(Kedarnath) आणि उत्तरकाशी (Uttarkashi) जिल्ह्यातील गंगोत्री आणि यमुनोत्रीचे  दर्शन घेतील. अंत्यसस्कार आणि लग्नात येणाऱ्या लोकांची संख्या 20 वरुन 50 करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच लग्नविधीसाठी उपस्थिती राहण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी अहवाल अनिवार्य आहे, अशी माहिती उनियाल यांनी यावेळी दिली आहे.

याशिवाय, आठवड्यातील पाच दिवस मिठाईचे दुकानेसुध्दा खुले राहतील. दुकानदारांनी मिठाई खराब होत असल्यामुळे उत्तराखंड सरकारने हा निर्णय घेतला आहे. संचारबंदीच्या कालावधीमध्ये टेंपो आणि ऑटो सुरु राहतील. राज्यातील महसूलाची प्रकरणे निकाली काढण्यासाठी 20 जणांच्या मर्यादीत संख्येत महसूल न्यायालये सुरु करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (central health ministry) दिलेल्या माहितीनुसार, देशात सलग सातव्या दिवशी 1 लाखांपेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 10 लाखांपेक्षा कमी झाली आहे. गेल्या चोवीस तासामध्ये ७०,४२१ नवीन करोनाचे रुग्ण आढळले आहेत. तसेच 3921 कोरोना रुग्णांचा मृ्त्यू झाला आहे. दरम्यान 1 लाख 19 हजार 501 रुग्णांनी  कोरोनावर मात केली आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com