Madhya Pradesh: दिलजले आशिकने सुरु केला चहाचा स्टॉल, नाव ठेवले 'M बेवफा चाय वाला'

Tea Shop: मध्य प्रदेशमधील खिलचीपूर शहरातील बसस्थानकावर असलेला चहाचा स्टॉल लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
M Chai Walla
M Chai WallaDainik Gomantak

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमधील खिलचीपूर शहरातील बसस्थानकावर असलेले चहाचे दुकान लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावरही या दुकानाची चर्चा होत आहे. या दुकानातील चहापेक्षाही त्याचे नाव लोकांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. त्याचे नाव आहे, 'एम बेवफा चाय वाला'.

दरम्यान, तुम्हाला हे नाव भन्नाट वाटत असेल तर या नावामागे एका अयशस्वी प्रियकराची वेदना दडलेली आहे. प्रेयसीच्या प्रेमात फसवणूक झाल्याचे प्रियकर सांगतो. या प्रियकराच्या प्रेयसीचे नाव एम अक्षराने सुरु होते. वास्तविक, प्रेयसीला चिडवण्यासाठी आणि ग्राहकांना (Customers) आकर्षित करण्यासाठी प्रियकराने हे नाव ठेवले आहे.

M Chai Walla
Madhya Pradesh Murder Case : श्रद्धा हत्याकांडानंतर आणखी एक थरकाप उडवणारी घटना; त्याने चिरला प्रेयसीचा गळा

दुसरीकडे, या दुकानातील चहाच्या किमती बदलतात आणि अतिशय मनोरंजक आधारावर निर्धारित केल्या जातात. उदाहरणार्थ, जर प्रेमळ जोडप्याने या दुकानात चहा प्यायला असेल तर त्यांना एका कप चहासाठी 10 रुपये मोजावे लागतील. तर दिलजले आशिक चहा प्यायला पोहोचला तर त्याला 5 रुपयांची ऑफर मिळेल.

M Chai Walla
Madhya Pradesh: मध्य प्रदेशचे ऊर्जा मंत्री म्हणाले, 'हवं असेल तर मला जोडे मारा...'

आता हे दुकान उघडणाऱ्या तरुणाबद्दल बोलूया, अंतर गुर्जर असे या तरुणाचे नाव आहे. अंतर सांगतो की, पाच वर्षांपूर्वी एका लग्नानिमित्त आलेल्या मुलीशी माझी भेट झाली होती. पहिल्या भेटीनंतर दोघांची मैत्री झाली. दोघांनी एकमेकांचा मोबाईल नंबर शेअर केला आणि त्यानंतर मोबाईलवर (Mobile) बोलणं सुरु झालं जे दीड वर्ष सुरु राहिलं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com