'तमिळनाडू'ने मोडला पावसाचा शंभर वर्षांचा विक्रम..!

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 7 जानेवारी 2021

चेन्नई आणि उपनगरे तसेच नजीकच्या काही जिल्ह्यांत डिसेंबर- जानेवारीमध्ये पडलेल्या पावसाने यंदा शंभर वर्षांचा विक्रम मोडीत काढल्याची बाब उघड झाली आहे.

चेन्नई : चेन्नई आणि उपनगरे तसेच नजीकच्या काही जिल्ह्यांत डिसेंबर- जानेवारीमध्ये पडलेल्या पावसाने यंदा शंभर वर्षांचा विक्रम मोडीत काढल्याची बाब उघड झाली आहे. सर्वसाधारणपणे मारगाझी या तमिळ महिन्यामध्ये राज्यात पाऊस पडतो तेव्हा सर्वत्र थंडीचे वातावरण असते. यंदा मात्र पावसाने शंभर वर्षांचा उच्चांक मोडीत काढला आहे. राज्यामध्ये १९१५ नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याचे सूत्रांनी सांगितले. जानेवारी महिन्यामध्ये तमिळनाडूत एवढा जोरदार पाऊस पडण्याची ही दुसरी वेळ आहे. राज्यात सध्या पोंगलच्या तयारीला वेग आला असून शेतकरी पिके काढण्यात व्यग्र असतानाच पावसाने फटका दिला.

पंजाब, हरियानात पाऊस सुरूच

पंजाब, हरियानातही पावसाने हजेरी लावली. गेल्या २४ तासांत चंदिगड (३ मि.मी.), अंबाला (८ मि.मी.), हिस्सार (७.६ मि.मी.), कर्नाल (२५ मि.मी.) पावसाची नोंद झाली. पावसानंतर तापमानात मात्र सरासरीपेक्षा वाढ झाली. चंडीगडमध्ये १३.६ अंश किमान तापमान नोंदविले गेले. ते सरासरीपेक्षा आठ अंशांनी जास्त होते.

 

अधिक वाचा :

श्रीनगरमध्ये हिमवर्षाव सुरूच..४५०० वाहने अडकली

लव्ह जिहाद : उत्तरप्रदेश, उत्तराखंडच्या कायद्यांची सर्वोच्च न्यायालय करणार पडताळणी

आंदोलक शेतकरी आज राजधानी दिल्लीला चहूबाजूंनी घेरणार..

संबंधित बातम्या