चेन्नईचा नवा पॅटर्न देतोय कोरोनाला टक्कर!

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 12 मे 2021

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चेन्नई महानगरपालिकेने आता नव्या तंत्रांचा आणि पर्यायांचा विचार केला आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला असताना कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चेन्नई महानगरपालिकेने (Chennai Corporation) आता नव्या तंत्रांचा आणि पर्यायांचा विचार केला आहे. आता ते घरोघरी जाऊन स्क्रिनिंग करणं, फोनवरुन आरोग्यविषयक सल्ला देण्यासाठी नव्या डॉक्टरांची नेमणूक करणं तसेच टेस्टींग सेंटरमध्ये स्वॅब चाचणी करणाऱ्यांना औषधांच्या कीट्सचं मोफत वाटप करणं अशा योजना राबवणार आहे. (Chennais new pattern is giving a bump to Corona)

चेन्नई महापालिका आयुक्त गगनदीप सिंग बेदी (Gagandeep Singh Bedi) यांनी सांगितलं की, जे कोणी सरकारी टेस्टींग सेंटर्स आणि खासगी दवाखान्यात कोरोनाची चाचणी करण्यासाठी येतील तेव्हा त्यांना ताप, कप, अंगदुखी, चव न लागणे, वास न येणे अशी लक्षणं आढळून आल्यास त्या व्यक्तीला संशयित म्हणून गणलं जाणार आहे. तसंच त्यांना काही प्राथमिक औषधं असलेलं पीपीई कीट मोफत दिलं जाणार आहे. ते म्हणाले की, जे लोक आपल्या कोरोना अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत ते इतर लोकांच्या संपर्कात येऊन कोरोना संसर्गाचा प्रसार करत आहेत.

दिल्लीला कोवॅक्सिन लसीचे डोस द्यायला नकार; उपमुख्यमंत्री सिसोदिया आक्रमक

त्याचबरोबर घरोघरी जाऊन 60 वर्षावरील सर्व लोकांचं स्क्रिनिंग करण्यात येणार असल्याची माहीतीही महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून  देण्यात आली. यानंतर त्यांनी स्वत:च्या घरीच होमक्वारंटाइनमध्ये रहावे किंवा कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे याबद्दल माहिती दिली जाणार आहे.

महापालिका प्रशासनाकडून 15 विभांगासाठी प्रत्येकी 1 आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी त्या त्या भागामधील कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करतील. कोरोनाला रोखण्यासाठी महानगरपालिका एमबीबीएसच्या शेवटच्या३ वर्षामध्ये शिकणाऱ्या 300 विद्यार्थ्यांनाही कंत्राटी पध्दतीने तीन महिन्यांसाठी सेवेत भरती करुन घेणार आहेत. 15 विभागांमध्ये उभारण्यात आलेल्या नियत्रंण कक्षांमधून हे डॉक्टर्स काम करतील. 
 

संबंधित बातम्या