कोरोना जनजागृती करण्यासाठी छत्तीसगड सरकारची आगळीवेगळी लसीकरण मोहीम     

दैनिक गोमंतक
मंगळवार, 20 एप्रिल 2021

परंतु लसीकरणाला घेऊन पसरवलेल्या अफवा आणि लॉकडाऊनमुळे अनेक लोक लसीकरणापासून वंचित राहत आहेत. लोकांना लसीकारण केंद्रापर्यंत येण्याकरिता बिजापूर मधील नगर निगमने एक आगळीवेगळी संकल्पना काढली आहे.

छत्तीसगड :  संपूर्ण जगात कोरोनाची दुसरी थैमान घालत  आहे.  दवाख्यामध्ये बेड्स उपलब्ध नाहीत. आवश्यक त्या औषधांसह ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची तुटवडा आहे. दुसरीकडे सरकार प्रयत्न करत आहे की  जास्तीत जास्त योग्य लोकांना कोरोनाची लस मिळायला पाहीजे. परंतु लसीकरणाला घेऊन पसरवलेल्या अफवा आणि लॉकडाऊनमुळे अनेक लोक लसीकरणापासून वंचित राहत आहेत. लोकांना लसीकारण केंद्रापर्यंत येण्याकरिता बिजापूर मधील नगर निगमने एक आगळीवेगळी संकल्पना काढली आहे. कोरोनाची लस घ्या करीत येणाऱ्या लोकांना दोन किलो टोमॅटो  मोफत दिले जात आहे.  नगर निगमधील या संकल्पनेची चर्चा सर्वत्र होत आहे. (Chhattisgarh government's unique vaccination campaign to raise awareness about corona) 

 किती दिवस राहणार कोरोनाची दुसरी लाट ?  संशोधकांनी दिले उत्तर

विजापूर नगरपालिकेचे अध्याक्ष बेनहुर रावतीय यांनी 18 एप्रिलला आरोग्य विभागाच्या सहकार्याने " कोरोना लसीकरण करा ,दोन किलो टमाटर मोफत मिळवा" अशी अशी संकल्पना मांडली.  या संकल्पने अंतर्गत ज्या लोकांना  लस दिली गेली त्यांना दोन किलो टमाटर मोफत देण्यात आले होते. स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, लॉकडाऊनमुळे या कार्यावर परिणाम झाला आहे. भाजीपाला व्यापारांची सर्वात वाईट अवस्था आहे, कारण या गोष्टी थोड्या वेळाने खराब होतात आणि फेकून द्याव्या लागतात. टोमॅटो खराब होण्याअगोदर एका व्यावसायिकाने पालिकेला टोमॅटो  दिले होते. पालिका अधिकाऱ्यांनी याचा सदुपयोग केला आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी "लसीकरण करा,  टोमॅटो मोफत घ्या.'' अशी संकल्पना मांडली.  

यामुळे कोरोनावर किरकोळ अंकुश लागला आहे. या संकल्पनेमुळे कोरोना संसर्ग कमी झाल्याचा दिसत आहे. 19 एप्रिल ला राज्यात 48,673 तपासणी केल्या होत्या. या तपासणी मध्ये 13 834 नवीन रुग्णांची नोंद झाले.  राज्यातही कोरोनामुळे165 रुग्णांचा मृत्यू झाला.  तर एका आठवड्यानंतर, संक्रमणाचा दर ३० टक्क्यांहून कमी झाल्याचा पाहायला मिळाला. 19 एप्रिलला रायपूर जिल्ह्यात सर्वाधिक 2378 रुग्ण सापडले आहेत. रायपूरमध्ये सर्वाधिक कोरोना कारण मृत्यूची संख्या पाहायला मिळाली आहे. राज्यातील 28 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या