Pythons : काय सांगता? 'या' गावात 200 वर्षे जुन्या झाडावर राहतात 150 हून अधिक अजगर

अजब-गजब आहे हे गाव कारण वाचुन तुम्हीही व्हाल थक्क
Pythons
PythonsDainik Gomantak

Pythons: छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा जिल्ह्यात असे एक झाड आहे, जे अजगरांचे घर आहे. हे वाचुन आश्चर्याचा धक्काच बसला ना!  होय, या झाडावर दीडशेहून अधिक अजगर राहतात. 

जांजगीर शहरापासून 10-12 किलोमीटर अंतरावर असलेल्या भदेसर गावात असलेल्या पिंपळाच्या झाडावर हे अजगर अगदी आरामात एकत्र राहतात. हे झाड महात्मा राम पांडे यांच्या घरी आहे. त्यांनी हे अजगर झाडावर पाळले आहे.

  • 200 वर्ष जुने आहे झाड

येथील झाडाचे वय सुमारे 200 वर्षे असल्याचे सांगितले जाते. जुने झाड असल्याने झाड आतून पोकळ आहे. या पोकळ खोडांमध्ये अजगर साप राहतात. ते कधीही कोणाचे नुकसान करत नाही. 

पावसाळ्यात झाडाचा पोकळ भाग पाण्याने भरला की झाडातून अनेक अजगर बाहेर येतात. याच वेळी अजगर पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडते. स्थानिक लोक सांगतात की, हिंसक प्राणी असूनही अजगरांनी कधीही कोणाला इजा केली नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना आपले शिकार बनवत नाहीत.

Pythons
Bipin Rawat Birth Anniversary: CDS जनरल बिपिन रावत यांचे ते स्वप्न अधुरेच राहिले...पण त्यांचे शौर्य आजही जिवंत

अजगरांची काळजी घेणारे आत्माराम पांडे यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी पिंपळाच्या झाडाजवळ शेत असायचे. तेव्हा आजोबांनी अजगराला झाडात आश्रय दिला होता. तेव्हापासून अजगर पिंपळाच्या झाडावर राहू लागले. 

विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून झाडावर राहणारे अजगर लवकरच नवीन अजगरांशी एकरूप होतात. दुरून पाहिल्यास झाडांच्या फांद्याच्या रंगात हे अजगर मिक्स झालेले दिसतात. त्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण होते.आत्माराम आजूबाजूच्या गावातून सोडलेले अजगर आणून झाडावर सोडतात.

गावकरी अजगराला पूजनीय मानतात

भडेसर गावात राहणाऱ्या लोकांचा असा विश्वास आहे की हा प्राणी संपत्ती देणार आहे. त्यामुळे गावकरी अजगराला पूजनीय मानतात. असे मानले जाते की घरात अजगर असणे शुभ लक्षण असते. कारण जीवनात धन आणि कीर्ती मिळते. यामुळेच प्रत्येक विशेष सणाला योथील नागिरक अजगरांचे आशीर्वाद घेण्यासाठी झाडाजवळ जाऊन पिंपळाच्या झाडाची पूजा करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com