भाजपच्या जाहीरनाम्यात चिदंबरम यांच्या सुनेच्या डान्सची क्लिप, व्हिडीओ व्हायरल

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 31 मार्च 2021

कॉंग्रेसवर टिका करणाऱ्या भाजपने कॉंग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या सुनेच्या डान्सची क्लिप प्रचाराच्या व्हिडिओमध्ये समाविष्ठ केली आहे.

चेन्नई: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरु असताना तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी एकिकडे कॉंग्रेस आणि द्रमुकवर हल्लाबोल करत असताना एक मोठा घोटाळा झाला आहे. तामिळनाडू भाजपने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेल्या एका व्हिडिओमध्येच एक मोठी चूक झाली असल्याचे समोर आले आहे. कॉंग्रेसवर टिका करणाऱ्या भाजपने कॉंग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या सुनेच्या डान्सची क्लिप प्रचाराच्या व्हिडिओमध्ये समाविष्ठ केली आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा सांगणारा भाजपचा हा व्हिडिओ असून, भाजपच्या चुकीची तामिळनाडूच्या राजकिय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

देशात पाच राज्यांमध्ये निवडणुका होत, असून राजकिय पक्षांच्या प्रचाराची धामधूम पहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्य़ातील मतदान पार पडले आहे. राजकिय प्रचाराच्या धामधूमीत सत्ताधारी आणि विरोधक एकमेंकावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. तामिळनाडूच्या राजकिय वर्तुळात असेच काहीसे चित्र असून, भाजपकडून कॉंग्रेस आणि द्रमकला लक्ष केलं जात आहे. नुकताच भाजपकडून तामिळनाडू निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिध्द केला असून तो व्हिडिओच्या स्वरुपामध्ये तयार कण्यात आला आहे. (Chidambarams golden dance clip in BJPs manifesto video goes viral)

West Bengal : भाजपा उमेदवार अशोक दिंडाच्या गाडीवर हल्ला; टीएमसी समर्थकांवर आरोप

भाजपने हा व्हिडिओ तयार करत असताना कॉंग्रेस नेते आणि केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या सुनेच्या नृत्याची क्लिप घेतली आहे. चिदंबरम यांची सून स्त्रीनिधी या वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत आहेत. आणि त्यांनी आपली नृत्याची आवडही जपली आहे. स्त्रीनिधी यांच्या भरतनाट्यम करतानाच्या व्हिडिओतील काही भाग भाजपने आपल्या जाहीरनाम्याच्या व्हिडिओमध्ये समाविष्ट केला आहे.

भाजपच्या या चुकीवर कॉंग्रेसने बोट ठेवत हल्लाबोल केला आहे. विनापरवाना चिदंबरम यांच्या सुनेच्या डान्सची क्लिप वापरल्यामुळे कॉंग्रेसने भाजपला सुनावलं सुध्दा आहे. ‘’क्लिप वापरण्यासाठी सहमती घेणं हे तुमच्यासाठी एक अवघड गोष्ट आहे, हे आम्ही समजू शकतो. परंतु तुम्ही विनापरवानगी स्त्रीनिधी किर्ती चिदंबरम यांचा फोटो वापरु शकत नाही. यामधून तुम्ही सिध्द केलं आहे की, तुमची मोहीम पूर्णपणे असत्यावर आधारित आहे,’’ अशी टिका तामिळनाडू कॉंग्रेसने केली आहे.   

 

संबंधित बातम्या