पंतप्रधानांचे मुख्य़ सल्लागार पी. के. सिन्हा यांचा राजीनामा

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 16 मार्च 2021

सप्टेंबर 2019 मध्ये पंतप्रधानांचे मुख्य सल्लागारपदी सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली होती.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार पी.के. सिन्हा यांनी राजीनामा दिला आहे. वयैक्तिक कारणांसाठी सिन्हा यांनी राजीनामा दिला असल्याचे समोर आले आहे. सप्टेंबर 2019 मध्ये पंतप्रधानांचे मुख्य सल्लागारपदी सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली होती.

भारतीय प्रशासकीय सेवेच्या 1977 तुकडीचे सिन्हा अधिकारी आहेत. त्यांनी याआधी पंतप्रधान कार्यालयामध्ये ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. याशिवाय सिन्हा उर्जा मंत्रालयात सचिवपदी देखील कार्यरत होते. तसेच त्यांनी चार वर्षे मंत्रीमंडळ सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. 
 

संबंधित बातम्या