Supreme Court: सरन्यायाधीशांनी आणलेल्या नव्या पद्धतीवर खंडपीठाने व्यक्त केली नाराजी

Justice UU Lalit: सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सरन्यायाधीश यू यू लळित यांनी आणलेल्या प्रकरणांची लिस्टिंग करण्याच्या नव्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
Justice UU Lalit
Justice UU LalitDainik Gomantak

Justice UU Lalit: सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सरन्यायाधीश यू यू लळित यांनी आणलेल्या प्रकरणांची लिस्टिंग करण्याच्या नव्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. UU लळित यांनी एक नवीन प्रणाली आणली आहे, ज्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले खटले जलदगतीने निकाली काढता येतील. मात्र खंडपीठाने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान या यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान सांगितले की, "नवीन लिस्टींग प्रणाली खटल्यांच्या सुनावणीसाठी पुरेसा वेळ देत नाही."

दरम्यान, ज्या मुद्द्यावर खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले त्यावर आता पुढील सुनावणी 15 नोव्हेंबर रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) खटल्यांची लिस्टींग करण्याच्या नव्या यंत्रणेअंतर्गत न्यायाधीश दोन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतील. नव्या प्रणालीनुसार, दर आठवड्याला सोमवार आणि शुक्रवारी 30 न्यायाधीश दोन वेगवेगळ्या गटात बसतील. प्रत्येक गट 60 वेगवेगळ्या प्रकरणांची सुनावणी करेल. यामध्ये नव्याने दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकांचाही समावेश असेल. या यंत्रणेअंतर्गत दर मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी तीन न्यायमूर्तींची खंडपीठे बसतील. त्यांच्या वतीने दुपारी एक वाजेपर्यंत अनेक वर्षे प्रतंलबित असणाऱ्या जुन्या खटल्यांवर सुनावणी होईल.

Justice UU Lalit
Supreme Court: 'नैतिक शिक्षणाचा संबंध कोणत्याही धर्माशी जोडणे चुकीचे'

एवढेच नाही तर दुपारच्या जेवणानंतर न्यायालयाचे कामकाज पुन्हा सुरु होईल, तेव्हा दोन न्यायमूर्तींची खंडपीठे बसतील आणि ते खटले हस्तांतरण आणि नवीन खटल्यांच्या अर्जांवर सुनावणी घेतील. याशिवाय जनहित याचिकांवरही या खंडपीठांद्वारे सुनावणी होणार आहे.

Justice UU Lalit
Supreme Court: '...अजूनही कलम-66A अंतर्गत गुन्हा नोंदवला जातो, ही चिंतेची बाब'

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य न्यायाधीश यूयू लळित यांनी 27 ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारला. तेव्हापासून आतापर्यंत एकूण पाच हजार खटले नव्या यंत्रणेच्या माध्यमातून निकाली काढण्यात आले आहेत. एकूण 13 दिवसांत सर्वोच्च न्यायालयाने 3,500 विविध प्रकरणे निकाली काढली आहेत. याशिवाय, नियमित सुनावणीच्या 250 प्रकरणांची आणि 1,200 हस्तांतरण प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com