Karnataka: लॉकडाऊन बद्दल मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी स्पष्ट केली भूमिका

दैनिक गोमंतक
मंगळवार, 13 एप्रिल 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना विचारले असता आवश्यकता भासल्यास परिस्थितीचा विचार करून राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात येऊ शकतो असे सांगितले आहे.

देशात वाढत दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णाच संख्येमुळे आरोग्य व्यस्थेवर मोठा भार निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळते आहे. कर्नाटक मध्ये सुद्धा कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसते आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना विचारले असता आवश्यकता भासल्यास परिस्थितीचा विचार करून राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात येऊ शकतो असे सांगितले आहे. (Chief Minister B S Yeddyurappa clarified the role regarding lockdown)

'लोकांना त्यांच्या फायद्यासाठी विचार करावा लागेल. त्यांनी खबरदारी न घेतल्यास कठोर उपाय करावे लागणार असून, आवश्यक भासल्यास आम्ही लॉकडाऊनची अंमलबजावणी करू' असे राज्याचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढत्या प्रकरणाच्या प्रश्नावर प्रतिक्रिया व्यक्त करताना  'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांवरही चर्चा केली होती, तसेच संसर्ग वाढत असणाऱ्या जिल्ह्यांत नाईट कर्फ्यू लावण्याचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी याना दिल्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सांगितले आहे. 

लोकांनी मास्क वापरले पाहिजे, गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन केले पाहिजे तसेच सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे असे आवाहन सुद्धा मुख्यमंत्री येडियुरप्पा (B S Yeddyurappa) यांनी यावेळी लोकांना केले आहे. लोकांनी सहकार्य केले तर कोरोना विषाणूच्या (Corona Virus) दुसर्‍या लाटेचा पराभव होऊ शकतो, असे मत आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर (D K Sudhakar) यांनी व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या