बेळगावमध्ये झालेल्या बालक अपहरणाचा 24 तासांत पर्दाफाश

बेळगावमध्ये झालेल्या बालक अपहरणाचा 24 तासांत पर्दाफाश
Child abduction in Belgaum exposed in 24 hours

अथणी : अथणी तालुक्यातील अपहरण झालेल्या लहान मुलाला 24 तासांच्या आत शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. वेगवान हालचाली करत पोलिसांनी 24 तासांमध्येच आरोपींना शोधून काढलं आहे. या कामगिरीमसाठी जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबर्गींनी या आरोपींचा छडा लावणाऱ्या पथकातील पोलिसांना बक्षिस देणार येण्यात असल्याचं सांगितलं आहे. 

काल बेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्‍यात असलेल्या संकोनट्टी गावातील यल्लाप्पा जिनाप्पा बहुरूपी या दोन वर्षांच्या मुलाचं अपहरण झालं होते. नराधम आरोपंचा या बालकाला 4 लाख रूपयांना विकण्याचा डाव होता. परंतु पोलिसांनी तत्परता दाखवत या बालकाला विक्री होण्यापासून वाचवले. या बालकाला त्याच्या कुटुंबाकडे स्वाधिन करण्यात आले आहे.

अवघ्या चोवीस तासांत या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी या कटामागे हात असणाऱ्या 5 ओरोपींना ताब्यात घेऊन या गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली दोन वाहनेदेखील जप्त केली आहेत.अथणीतीलच एका मुलबाळ नसलेल्या महिलेला विकण्यासाठी या बालकाचं अपहरण करण्यात आलं होतं. यासाठी सदर महिलेने २ लाख रूपये मोजले होते. यापैकी 60 हजार आरोपींनी खर्च केले आहेत.  बेळगाव जिल्ह्याचे पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी, , अथणीचे पोलिस उपाधीक्षक एस. व्ही. गिरीश, जिल्हा पोलिसप्रमुख अमरनाथ रेड्डी, मंडल पोलिस निरीक्षक शंकरगौडा बसगौडर इत्यादींच्या मार्गदर्शनाखाली या अपहरणाचा छडा लावण्यात आला. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com