दु:खद घटना..; खासदाराच्या 6 वर्षांच्या नातीचा फटाक्यांमुळे जळून मृत्यू

गोमंतक ऑनलाईन टीम
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

रीता बहुगुणा या प्रयागराजमधून संसदेत खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. दिवाळीच्या दिवशी त्या आपल्या परिवारासोबत एकत्र होत्या. याच दरम्यान, दिवाळीच्या दिवशी त्यांची नात दुसऱ्या मुलांबरोबर खेळायला छतावर गेली होती.

प्रयागराज- बघता बघता 2020 या वर्षातील दिवाळी संपली. यानंतर फटाक्यांमुऴे प्रदुषण किती वाढले यावर अद्याप चर्चा चालू झाली असेल. मात्र, फटाक्यांमुळे एक आणखीन धक्कादायक बातमी घडली असून उत्तर प्रदेशमधील भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि खासदार रीता बहुगुणा जोशी यांच्या 6 वर्षांच्या नातीला आपला जीव गमवावा लागला आहे. रीता यांचे पुत्र मयंक यांची कन्या दीपावलीच्या दिवशी घराच्या छतावर आपल्या सवंगड्यांसोबत दिवाळी साजरी करायला गेली होती. तेथेच फटक्यांच्या आतषबाजीत तिचा जळून मृत्यू झाला.  

 दिवाळी साजरी करण्यासाठी एकत्र आले होते कुटुंब- 

रीता बहुगुणा या प्रयागराजमधून संसदेत खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. दिवाळीच्या दिवशी त्या आपल्या परिवारासोबत एकत्र होत्या. याच दरम्यान, दिवाळीच्या दिवशी त्यांची नात दुसऱ्या मुलांबरोबर खेळायला छतावर गेली होती. खेळताना तिच्या जवळच फटाका फूटल्याने ही घटना घडली. फटाक्यांच्या अग्नीमुळे तिच्या कपड्यांना आग लागली. या दुर्घटनेत ती 60 टक्क्यांपेक्षाही जास्त जळाल्याने तिला प्राणास मुकावे लागले.    

 प्रयागराज येथील खासगी रूग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती खालावल्याने तिला एअर अॅम्बुलन्सने दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले. या दरम्यान तिचा रात्री 3 वाजता मृत्यू झाला. 
 

संबंधित बातम्या