
सिपरी बाजार येथे राहणारा एक किशोरवयीन मुलगा दिवसभर मोबाईलला चिकटून असायचा. दहावी बोर्डाची परीक्षा जवळ आल्यावर पालकांनी मोबाईल गेम खेळण्यास मनाई केली. त्यानंतर मुलाने रात्री जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळण्यास सुरुवात केली. कुटुंबातील सदस्य झोपल्यानंतर किशोर रात्रभर मोबाईल गेम खेळत असायचा. झाशीतील ही घटना असून गेम खेळण्यास नकार दिल्याने मुलाने कुटुंबीयांना मारहाण करण्यासही सुरवात केली.
लखनऊमध्ये नुकतीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मोबाईल गेम PUBG खेळण्यापासून रोखल्यामुळे एका मुलाने आईची गोळ्या झाडून हत्या केली. एवढेच नाही तर मृतदेह तीन दिवस लपवून ठेवण्यात आला होता. यानंतर सिपरी बाजार येथील मुलाने कोणताही अडथळा न करता मोबाईल गेम खेळता यावा म्हणून घरातील सदस्यांना झोपेच्या गोळ्या देण्यास सुरुवात केली. या गोळ्यांमुळे घरातील सदस्यांना शारीरिक त्रास होऊ शकतो, हे त्याच्या मनातही आले नव्हते.
कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी मुलाच्या खोलीची झडती घेतली. झोपेच्या गोळ्या सापडल्यावर हे गुपित उघड झाले. सध्या त्याच्यावर मानसोपचार तज्ञाकडे उपचार सुरू आहेत. अहवालानुसार, एका महिन्यात आठ ते दहा मुलानी असे हिंसक वर्तन केले आहे. काही मुलांनी तर आपल्या कुटुंबीयांना आत्महत्येची धमकी दिली.
हा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरचा (ओसीडी) आजार असल्याचे तज्ञांनी सांगितले. यामध्ये जर रुग्णाला त्या गेमची ओढ लागली तर तो त्यापासून वेगळे होऊ शकत नाही. अशा रुग्णांना मोबाईल गेम खेळायला आवडत असेल तर त्यांना त्यात आनंद मिळतो. त्यांना मोबाईल गेम्सचे व्यसन लागते. इतर सर्व काही, अगदी नातेवाईकांची उपस्थिती देखील त्यांच्यासाठी महत्वाची नसते. पुढे जावून असे मुलं अनेक प्रकारच्या मानसिक आजारांला आणि नैराश्याला बळी पडतात.
पालकांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात
मूल मोबाईलवर गेम खेळत आहे की अभ्यास करत आहे यावर पालकांनी लक्ष ठेवावे.
गेमचे व्यसन असेल तर त्याचे लक्ष दुसरीकडे केंद्रित करा
मुलांना मारहाण करू नका, त्यांना समजावून सांगा की हे व्यसन हा आजार
आहे
मुल खूप जास्त व्यसनी झालेत तर उपचार घ्या
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.