अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेले युवक चीनमध्ये : किरण रिजीजू

पीटीआय
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

पाच युवकांचा शोध सुरु असताना लष्कराने चीनशी हॉटलाइनवरून संवाद साधत विचारपूस केली. यावेळी त्यांनी हे पाच युवक आपल्या भागात आल्याचे सांगितले, अशी माहिती रिजीजू यांनी दिली. 

नवी दिल्ली: अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेले पाच भारतीय युवक चीनमध्ये सापडले असल्याचे चिनी लष्कराने भारताला कळविले असून, या युवकांना परत आणण्याच्या प्रक्रियेबाबत चर्चा सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी आज सांगितले. हे पाच युवक चार दिवसांपूर्वी अप्पर सुबनसिरी जिल्ह्याला लागून असलेल्या भारत-चीन सीमेवरून बेपत्ता झाले होते. 

पाच युवकांचा शोध सुरु असताना लष्कराने चीनशी हॉटलाइनवरून संवाद साधत विचारपूस केली. यावेळी त्यांनी हे पाच युवक आपल्या भागात आल्याचे सांगितले, अशी माहिती रिजीजू यांनी दिली. 

चीनचे याक परत दिले
इटानगर : प्रत्यक्ष ताबारेषा ओलांडून भारताच्या हद्दीत शिरलेली चिनी नागरिकांची जनावरे भारताने चीनला परत केली आहेत. चीनमधील १३ याक आणि चार वासरे ३१ ऑगस्टला अरुणाचल प्रदेशातील पूर्व कामेंग भागात भारतात शिरली होती. ती आता परत करण्यात आली आहेत. या कृतीबद्दल चीनने भारताचे आभार मानले आहेत.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या