सीमेलगत चीनचे १३ नवे संरक्षणतळ

पीटीआय
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

२०१७ मध्ये डोकलाममध्ये झालेल्या वादानंतर चीनने ताबारेषेनजीक किमान १३ नवे संरक्षणतळ उभारले आहेत.

नवी दिल्ली: २०१७ मध्ये डोकलाममध्ये झालेल्या वादानंतर चीनने ताबारेषेनजीक किमान १३ नवे संरक्षणतळ उभारले आहेत. यामध्ये तीन हवाईतळ, पाच कायमस्वरूपी हवाई संरक्षण यंत्रणा आणि पाच हेलिपॅड असल्याचे ‘स्ट्रॅटफॉर’ या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. यापैकी चार हेलिपॅडची उभारणी तर लडाखमधील वाद सुरू झाल्यानंतरच सुरू झाली, असे अहवालात म्हटले आहे.

या अहवालानुसार, डोकलाम वादानंतर चीनचा व्यूहात्मक दृष्टीकोन बदलला. त्यांनी तीनच वर्षांत भारताबरोबरील ताबा रेषेनजीक संरक्षण तळांची संख्या दुपटीने वाढविली. चीनच्या या कृतीमुळे त्यांची लष्करी ताकद वाढण्याबरोबरच या भागातील शांततेलाही दीर्घकाळासाठी नख लागले आहे. भारताने त्यांच्या हवाई दलात राफेल विमाने दाखल केल्याने या देशाला थोडा दिलासा मिळाला असला तरी स्वदेशी विमानांचे उत्पादन आणि आणखी विमानांची खरेदी यामध्ये येणाऱ्या वेगावर भारताची ताकद अवलंबून आहे. सीमेलगत पायाभूत यंत्रणा प्रचंड प्रमाणात वाढवून हव्या त्या वेळी आपल्या सैनिकांमागे पाठबळ निर्माण करता यावे आणि भारताला जेरीस आणावे, या उद्देशाने चीनने बांधकाम सुरु केले आहे. 
 

संबंधित बातम्या