‘अरुणाचल’जवळ नियंत्रण रेषेलगत चीनने वसविली तीन गावं

वृत्तसंस्था
सोमवार, 7 डिसेंबर 2020

 प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) चीनने तीन गावे वसविल्याची माहिती उघड झाली आहे. त्याची छायाचित्रे उपग्रहाने टिपली आहेत. पूर्व लडाखमध्ये तणावाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर चीनने पुन्हा एकदा कुरापत काढली आहे.

लडाख  :   प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) चीनने तीन गावे वसविल्याची माहिती उघड झाली आहे. त्याची छायाचित्रे उपग्रहाने टिपली आहेत. पूर्व लडाखमध्ये तणावाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर चीनने पुन्हा एकदा कुरापत काढली आहे. ज्या ठिकाणी चीनने ही तीन गावं वसविली आहेत, तो भाग अरुणाचल प्रदेशातील बमलापासून सुमारे पाच किलोमीटर दूर आहे. ‘एनडीटीव्ही’ या वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे. या गावांची उपग्रहांनी टिपलेली छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. चीनच्या या कुरापतीमुळे दोन्ही देशांतील संबंधातील गुंतागुंत अधिक वाढू शकते. 

 

भूतानच्या ताब्यातील भागामध्ये चीनने यापूर्वी काही गावे वसविली होती. भूतानमधील हा भाग २०१७ मध्ये भारत-चीनमधील डोकलाममध्ये झालेल्या संघर्षाच्या ठिकाणापासून केवळ सहा किमी दूर होता. “भारताच्या सीमेलगतच्या भागात हान चीनी आणि तिबेटमधील कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांची वस्ती निर्माण करुन आपला क्षेत्रीय दावा मजबूत करण्याच्या धोरणावर काम करत आहे. याद्वारे सीमवेर घुसखोरी वाढवण्याचाही चीनचा उद्देश आहे,`` असे मत संरक्षण विषयक तज्ज्ञ ब्रह्म चेलानी यांनी व्यक्त केले आहे.

 

वर्षभरातील बांधकाम

या भागात १७ फेब्रुवारी २०२० पर्यंत केवळ एक गाव दिसत होते. नव्याने घेतलेल्या छायाचित्रांत तीन गावे वसविण्यात आल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक गावांतील घरांची संख्या ५०च्या आसपास आहे. तिन्ही गावे एकमेकांपासून साधारणतः एक किलोमीटर अंतरावर आहेत. या गावांसाठी रस्तेही करण्यात आल्याचे छायाचित्रांत दिसत आहे.

 

अधिक वाचा :

शेतकरी आंदोलनाला देशव्यापी पाठिंबा ; विविध क्षेत्रांमधील व्यक्तींनी दर्शविले समर्थन 

 

संबंधित बातम्या