चीनने भारताच्या संयमाची परीक्षा पाहू नये

Dainik Gomantak
शनिवार, 20 जून 2020

लडाख सीमेवर चीनकडून भारतीय सैन्यावर झालेल्या हल्ला अत्यंत अशोभनीय कृत्य आहे. भारतीय जवानांवर झालेल्या या हल्याचा दत्त पद्मनाभ पीठाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. दीप प्रज्वलित करून शांतीमंत्र पठण करून शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

खांडोळा :

चीनी सैन्यांकडून भारतीय सैन्यावर केलेला हल्ला ही चीनसाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण सैनिकांवरच सैनिक हल्ला हे विश्वासघात चित्र आहे. चीनने भारताच्या संयमाची परीक्षा पाहू नये. ही कोणत्याच देशातील नागरिकांना शोभनीय गोष्ट नाही, असे कृत्य चीन देशाने केले. या कृत्याचा निषेध आहे. या लढाईत जे आपले भारतीय सैनिक शहीद झाले, देशासाठी त्यांनी हौतात्म्य पत्करलं. भारतीय जवानांचे बलिदान कधीच व्यर्थ जाणार नाही. आपल्या सैनिकांनी ध्‍यैर्याची कर्तव्य भूमिका बजावत देशासाठी जीवन अर्पण केले. आपल्या देशाचे संरक्षण करणारे जवान आज कशाचीच तमा न बाळगता देश सेवेसाठी सामोरे जात आहेत. आपण समस्त देशवासीयांनी कर्तव्यदक्ष होऊन आपल्या सैनिकांमागे उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन श्रीदत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर ब्रह्मेशानंद स्वामींनी केले.
लडाख सीमेवर चीनकडून भारतीय सैन्यावर झालेल्या हल्ला अत्यंत अशोभनीय कृत्य आहे. भारतीय जवानांवर झालेल्या या हल्याचा दत्त पद्मनाभ पीठाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. दीप प्रज्वलित करून शांतीमंत्र पठण करून शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

संबंधित बातम्या