‘हाँगकाँगबाबत चीनने फेरविचार करावा’

Dainik Gomantak
शुक्रवार, 19 जून 2020

फुटीरतावादी कारवाया रोखण्यासाठी हा कायदा आणल्याचा दावा चीनने केला आहे.

बर्लिन

हाँगकाँगमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याचा चीनने फेरविचार करावा, असे आवाहन विकसित देशांच्या जी-७ गटाने केली आहे. फुटीरतावादी कारवाया रोखण्यासाठी हा कायदा आणल्याचा दावा चीनने केला आहे. या कायद्यामुळे हाँगकाँगची स्वायत्तता भंग होणार असून, स्थानिकांनी याविरोधात प्रचंड आंदोलन सुरू केले आहे. आज ‘जी-७’ गटांनी एक निवेदन प्रसिद्ध करून चीनने हाँगकाँगबाबत आणलेल्या नव्या कायद्याबाबत चिंता व्यक्त केली. चीनच्या या कृतीमुळे स्वायत्त हाँगकाँगने आंतरराष्ट्रीय समुदायाबरोबर केलेल्या करारांचा भंग होत असल्याचे सांगत, चीनने हा कायदा लागू करण्याबाबत फेरविचार करावा, असे आवाहन जी-७ गटाने केले आहे.

संबंधित बातम्या