भारत-चीन लडाख सीमेवर एका चिनी सैनिकाला अटक

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

भारतीय लष्कराच्या सोमवारी पुर्वीच्या लढाईत चिनी सैनिकीचा अनुभव आला. हादराचे ताज्या प्रदर्शनजबळ (एलएसी) भटकला आहे, लढाऊ पेपल्स लिबरेशन आर्मी आर्मी (पीएलए) सैनिक सैनिक सैन्यसेनेचे पत्र आहे.

लडाख:  भारतीय लष्कराने सोमवारी पूर्व लडाखमध्ये एका चिनी सैनिकाला अटक केली. हा सैनिक प्रत्यक्ष ताबारेषेजबळ (एलएसी) भटकला आहे, लवकरच त्याला पीपल्स लिबरेशन आर्मीकडे (पीएलए) देण्यात येणार असल्याचे सैन्यातर्फे सांगण्यात आले आहे.

लष्कराने दिलेल्या माहीतीनुसार, कॉर्पोरल वांग या लाँग या चिनी सैनिकाला १९ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष ताबारेषेच्या पलीकडे जाण्याच्या मार्गावर पूर्व लडाखच्या डेमचोक सेक्टरमध्ये अटक करण्यात आली. बेपत्ता झालेल्या सैनिकाचा शोध घेण्याबाबत चिनी सैन्याकडून निवेदनही प्राप्त झाले आहे, सैन्याने म्हटले आहे की, “प्रस्थापित शिष्टाचारांची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर चिशुल-मोल्दो बैठकीच्या ठिकाणी या चिनी सैनिकाला चिनी अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येईल”.

ताब्यात घेतलेल्या चिनी सैनिकाला अत्यांतिक उंची आणि कठोर हवामानाच्या वातावरणापासून बचाव करण्यासाठी ऑक्सिजन, अन्न आणि उबदार कपड्यांसह वैद्यकीय मदत देण्यात आली असल्याचे भारतीय सैन्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.

दोन्ही देशांच्या नेत्यांनी मतभेद वादात परावर्तीत होऊ नयेत आणि सीमाभागात शांतता व सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी संयुक्तपणे अंमलबजावणी करण्यास सहमती दर्शविली असल्याचे संयुक्त निवेदनात नमूद केले आहे.

संबंधित बातम्या