चिनी सैनिकाला लडाखच्या चुशूल सेक्टरमध्ये भारतीय सैन्यांनी पकडलं

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 9 जानेवारी 2021

 भारतीय लष्करांनी पूर्व लडाखच्या चुशूल सेक्टरच्या गुरुंग हिल भागात चिनी सैनिकाला पकडण्यात आलं आहे.

लडाख : भारतीय लष्करांनी पूर्व लडाखच्या चुशूल सेक्टरच्या गुरुंग हिल भागात चिनी सैनिकाला पकडण्यात आलं आहे.चुकून तो भारतीय हद्दीत अल्याचे प्रथमदर्शनी माहिती मिळत आहे.आज किंवा उद्या त्याला चिनी सैनिकांकडे सोपवण्यात येणार आहे.काही महिन्यांभरापूर्वी असाच एक चिनी सैनिक भारतीय हद्दीत आल्यानंतर भारतीय सैन्याने त्यास पकडले होते.परंतु काही दिवसात प्रक्रिया पूर्ण करुन त्याला चीनकडे सोडण्यात आले होते.

मागील काही दिवसांपासून पूर्व लडाख भागात भारत-चीनमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता.मात्र लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या मात्र आपेक्षित यश मिळताना दिसले नाही.अजूनही सीमावादाचा तिढा सुटलेला नाही.भारतीय लष्करांनी चिनी सैनिकाला जशास तसे उत्तर दिले आहे.जून महिन्यात गलवान परिसरात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये मोठा संघर्ष माजला होता.याच भागातील महत्वाच्या टेकड्यां भारतीय सैनिकांनी आपल्या ताब्यात घेवून चीनवर रणनितीकदृष्ट्या विजय मिळवला आहे.

संबंधित बातम्या