पॅंगॉन्गच्या वादग्रस्त भागातून चीनचे टॅंक मागे जाण्यास सुरवात (व्हिडिओ) 

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

भारत आणि चीन यांच्यातील सैन्यात मागील वर्षाच्या मे महिन्यात लडाख मधील गलवान भागात जोरदार संघर्ष झाला होता. आणि त्यामुळे दोन्ही देशांनी आपापले सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर समोरासमोर उभे केले होते.

भारत आणि चीन यांच्यातील सैन्यात मागील वर्षाच्या मे महिन्यात लडाख मधील गलवान भागात जोरदार संघर्ष झाला होता. आणि त्यामुळे दोन्ही देशांनी आपापले सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर समोरासमोर उभे केले होते. मात्र त्यानंतर भारत आणि चीन यांच्यातील सैन्याच्या कोर कमांडर पातळीवरील नवव्या बैठकीत सैन्य माघारीसंदर्भात चर्चा होऊन, पॅंगॉन्ग सरोवराच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यावरील भागातून सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. लडाखच्या वादग्रस्त भागातून चिनी सैन्य माघार घेतल्याचा पहिला फोटो समोर आला आहे. भारतीय सैन्याने हा व्हिडिओ जारी केला असून, यामध्ये चिनी टॅंक फिंगर 8 कडे मागे परत जात असल्याचे दिसत आहे. 

टीएमसीच्या गुंडानी केली भाजपच्या 130 कार्यकर्त्यांची हत्या- अमित शहा

भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील सैन्यात नवीन वर्षाच्या 24 जानेवारीला कोर कमांडर स्तरावरील बैठक पार पडली होती. आणि या बैठकीत दोन्ही देशांनी पॅंगॉन्ग सरोवराच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यावरून आपापले सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शविली होती. त्यानुसार आज दोन्ही देशांच्या सैन्याने वादग्रस्त भागातून सैन्य मागे घेण्यास सुरवात केली आहे. व याबाबतचा व्हिडिओ भारताच्या सैन्याने जारी केला असून, यात चीनचे टॅंक आणि भारतीय सैन्य देखील मागे घेत असल्याचे दिसत आहे. 

भारत आणि चीन यांच्यातील सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये लोकल कमांडरची चर्चा झाल्याचे समजते. आणि त्यानंतर दोन्ही देशांनी पॅंगॉन्गच्या वादग्रस्त भागातून सैन्य मागे घेण्यास सुरवात केली. दोन्ही देशांचे सैन्य अधिकारी एकत्र येऊन ही प्रक्रिया पार पाडण्यात येत असून, स्थानिक कमांडर्स यांच्यात दररोज दोनदा बैठक होत असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी, दोन्ही देशांमध्ये झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीनने या भागात टॅंक तैनात केले होते. आणि आता टॅंक सहित कॉम्बॅट वाहने देखील मागे घेण्यास सुरवात केली आहे. तसेच सैन्य माघारीबाबत फिजिकल सह इलेक्ट्रॉनिक यंत्रणेची मदत देखील घेण्यात येणार आहे. यासाठी उपग्रह आणि ड्रोन वापरण्यात येणार आहे.    

दरम्यान, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन देताना, वास्तविक नियंत्रण रेषेवर भारताची तयारी मजबूत असल्याचे नमूद केले. याशिवाय भारताने चीनवर आघाडी मिळवली असल्याची माहिती त्यांनी दिली. आणि भारताने एक इंच भर जमीन देखील गमावली नसल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.  

संबंधित बातम्या