‘’नंदीग्रामची निवड ममतांची सर्वात मोठी चूक’’

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 3 एप्रिल 2021

ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा पश्चाताप होतो आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामध्ये प्रचारसभामधून आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झडताना दिसत आहेत. पश्चिम बंगालमधील सोनपूरमध्ये झालेल्या भाजपच्या प्रचारसभेत बोलताना पंतप्रधानांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर खोचक टिका केली आहे. ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा पश्चाताप होतो आहे. तृणमुल कॉंग्रेसमधील लोक सांगतात की ममता बॅनर्जी यांनी रागाच्या भरामध्ये नंदीग्राममधून निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांनी ही सर्वात मोठी केली आहे, असं मोदी यावेळी म्हणाले. स्वत:हा ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामची निवड केल्यामुळे या मतदारसंघात मोठी फाईट बघायला मिळत आहे.

ममता बॅनर्जी दरवेळी विधानसभा निवडणूकीत कोलकातामधील भवानीपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवतात. यंदा मात्र ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम मतदारसंघाची निवड केली. ममता बॅनर्जी यांचे एकेकाळचे सहकारी शुबेंदु अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून भाजपने अधिकारी यांना नंदीग्राममध्ये ममतांचे विरोधात उमेदवारी दिली आहे. नंदीग्राममध्ये अधिकारी यांचं प्राबल्य असल्यामुळे त्यांना या निवडणुकीमध्ये फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. तरीही ममता बॅनर्जी यांनी अधिकरी यांचे आव्हान स्वीकारत नंदीग्रामची निवड केली आहे. (Choosing Nandigram is Mamatas biggest mistake)

राहुल गांधी हे राजकीय पर्यटक; अमित शहा यांची बोचरी टीका 

दरम्यान ममता बॅनर्जी यांनी वाराणसीविषयीच्या विधानाचा देखील मोदींनी समाचार घेतला. ममता बॅनर्जी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकांसाठी मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये जाण्याचं आव्हान केलं होतं. त्यावर बोलताना मोदी म्हणाले, वाराणसीमध्ये ममता बॅनर्जी यांना मोठ्या मनाचे, टिळा लावलेले आणि शेंडी असलेले लोकं भेटतील त्याची त्यांना अडचण होईल. ईथे त्यांना जय श्रीराम घोषणेचा रागही गाता येतो. तसेच त्यांना हर हर महादेव सुध्दा गाता येते, असं मोदी यावेळी म्हणाले.

त्याचबरोबर मोदींनी तृणमुल कॉंग्रेसची खिल्लीदेखील उडवत म्हणाले, ‘’ममता दिदी तुम्ही पश्चिम बंगालच्या नागरिकांवर विश्वास ठेवायला हवा. बंगालच्या लोकांना कौल दिला आहे. त्यांचा निर्णय झाला आहे. तुम्हाला तुमची टाका मार कंपनी घेऊन येथून निघू जावं लागेल,’’ 

 

संबंधित बातम्या