कोविड-१९ च्या जागतिक संकटानंतर निर्यात बाजारपेठेत देशातील पहिले जहाज नेदरलॅण्डला रवाना

दैनिक गोमन्तक
रविवार, 20 डिसेंबर 2020

कोविड-१९ च्या जागतिक संकटानंतर निर्यात बाजारपेठेत देशातील पहिले जहाज बांधून पाठवले आहे. ''लेडी हेडविग'' नावाचे हे सर्वसाधारण माल वाहतूक जहाज नेदरलँड्सस्थित ''विजने ॲण्ड बॅरंड्स'' या ग्राहकासाठी रवाना झाले आहे. 

पणजी: चौगुले शिपयार्ड्स या चौगुले समूहाचा भाग असलेल्या कंपनीने कोविड-१९ च्या जागतिक संकटानंतर निर्यात बाजारपेठेत देशातील पहिले जहाज बांधून पाठवले आहे. ''लेडी हेडविग'' नावाचे हे सर्वसाधारण माल वाहतूक जहाज नेदरलँड्सस्थित ''विजने ॲण्ड बॅरंड्स'' या ग्राहकासाठी रवाना झाले आहे. 

जहाजाची लांबी ९८.२ मीटर असून, रुंदी १३.४ मीटर तर खोली ७.८ मीटर आहे. ग्राहकाने ऑर्डर केलेल्या सहा जहाजापैकी हे तिसरे आहे. आइस क्लास स्वीडिश फिनिश १अ दर्जाचे हे जहाज आहे. या प्रकारातील ही भारतात बांधलले हे पहिले जहाज आहे. या जहाजाने गोव्यातून आपला प्रवास सुरू केला आहे.

याबद्दल चौगुले अॅण्ड कंपनी प्रा. लि.चे कार्यकारी संचालक अर्जुन चौगुले म्हणाले, "कोविड-१९ संकटानंतर हे यश गाठणारे आम्ही भारतात पहिलेच असल्याचा आम्हाला आनंद वाटतो. ठरलेल्या वेळापत्रकाआधीच जहाजाची बांधणी करून जागतिक संकटातही जहाज बांधून पूर्ण करण्यावर परिणाम होणार नाही, याची खातरजमा करण्यासाठी आमच्या पथकाने अथक मेहनत घेतली. कोविड-१९ मधील नियमांमुळे ओईएम सर्विस इंजिनीअर्स उपलब्ध नसतानाही आमच्या पथकाने साधनांच्या उभारणीवर स्वत:च काम केले. अर्थात, ओईएम्सनी यासाठी दूरस्थ पद्धतीने साह्य केले. आम्ही भविष्यातही अशा जागतिक दर्जाच्या जहाजांची निर्मिती करण्यात सातत्य राखून पंतप्रधानांच्या ''आत्मनिर्भर भारत'' दृष्टिकोनाला हातभार लावू."

संबंधित बातम्या