प्रसिद्ध सॅंड आर्ट कलाकार सुदर्शन पट्टनाईंकांनी साकारलं सांताक्लॉजचं भव्य 3 डी शिल्प

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

ओडिशाच्या पुरी समुद्रकिनाऱ्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सॅंड आर्ट कलाकार सुदर्शन पट्टनाईक यांनी मास्क घातलेल्या सांताक्लॉजचे भव्य 3 डी  तयार करून नव्या विश्वविक्रमास गवसणी घालण्याचा करण्याचा प्रयत्न केला आहे.

ओडिशा :  गुरुवारी ओडिशाच्या पुरी समुद्रकिनाऱ्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सॅंड आर्ट कलाकार सुदर्शन पट्टनाईक यांनी मास्क घातलेल्या सांताक्लॉजचे भव्य 3 डी  तयार करून नव्या विश्वविक्रमास गवसणी घालण्याचा करण्याचा प्रयत्न केला आहे. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांच्या लाडक्या सांताक्लॉजचं थ्रीडी सँड आर्ट सॅंड आर्ट तयार केलंय, ज्यामध्ये दोन मास्क घातलेले सांताक्लॉज “मास्क वापरा, सुरक्षित रहा” हा  संदेश देत आहेत. तो लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाठविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

सुदर्शनने पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर साकारलेल्या या सँड आर्टची लांबी १२० फूट  आणि रुंदी 50 फूट असून, हे सॅंड आर्ट या बीचवर सुमारे 60000 स्क्वेअर फूट जागेत साकारलंय. हे सँड आर्ट साकारण्यासाठी सुदर्शन सॅंट आर्ट स्कूलच्या 20 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत हे सॅंड आर्ट 12 तासात पूर्ण केलंय. सांताक्लॉज बरोबरच ख्रिसमस ट्रीदेखील इथं साकारण्यात आलंय. "गेल्या २० वर्षांपासून मी ख्रिसमसच्याला सॅंड आर्ट साकारतो, ज्याची दखल लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डबरोबरच अनेक जागतिक विक्रमांनी घेतली आहे आपल्या सर्वांना माहित आहे की सध्या सुरू असलेल्या या कोरोना साथीमुळे  सण साजरा करण्यासाठी काही निर्बंध आहेत. म्हणून, आपण मास्क लावून आणि सामाजिक अंतर राखून डब्ल्यूएचओच्या सूचनांचे पालन केले पाहिजे," असे सुदर्शन म्हणाले. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असलेल्या सुदर्शन यांनी जगभरातील 60 हून अधिक आंतरराष्ट्रीय  आणि  सॅंड आर्ट उत्सवांमध्ये भाग घेतला आहे आणि बरीच बक्षिसेदेखील जिंकली आहेत.

संबंधित बातम्या