सिप्लाची कोविड -19 टेस्टिंग कीट आजपासून बाजारात उपलब्ध

दैनिक गोमंतक
मंगळवार, 25 मे 2021

सिप्ला (cipla) या कंपनीने RT-PCR टेस्ट कीट बाजारात आणली आहे. आजपासून ही टेस्ट कीट ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूला रोखण्यासाठी संपूर्ण जग औषध शोधण्यावर संशोधन करत आहे. परंतु अजूनही तज्ञाना त्यावर यश प्राप्त झाले नाही. कोरोना विषणूला आळा घालण्यासाठी परिणामकारक अशा औषधाची निर्मिती अध्यापही झालेली नाही. या विषणूला लढा देण्याकरिता आपल्या शरीराची रोगप्रतिकरक शक्ती वाढविने गरजेचे आहे. (Cipla's Covid-19 testing kit available in the market from today)

भारतात 'स्पुटनिक व्ही' लसीचं उत्पादन सुरु; वर्षाला 10 कोटी लस...

यासाठी काही कंपन्यांनी शरीराची रोगप्रतिकरक शक्ती वाढवण्यासाठी लसी बाजारात आणल्या आहेत. तसेच अनेक टेस्टिंग किट बाजारात मिळत आहेत. यामध्ये सिप्ला (cipla) या कंपनीने RT-PCR टेस्ट कीट बाजारात आणली आहे. आजपासून ही टेस्ट कीट ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. सिप्ला ही एक प्रसिद्ध औषध निर्मिती कंपनी आहे. या कंपनीने 'ViraGen' ही टेस्ट कीट बाजारात उपलब्ध केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ही कीट लॉच करण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून ही कीट विक्रीसाठी बाजारात आली आहे. 

18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी शासकीय केंद्रावर आता नोंदणीची गरज नाही 

कोरोना विषाणुच्या विरोधात लढा देण्यासाठी सिप्ला कंपनी कठोर परिश्रम करत आहे. सध्याच्या महामारीच्या काळात देशात प्रत्येक नगरिकांनापर्यंत योग्य त्या सुविधा मिळाव्यात आणि कोरोनावर योग्य ते उपचार व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत", असं सिप्ला कंपनीनेचे मॅनेजिंग डायरेक्टर उमंग वोहरा म्हणाले. पुढे ते म्हणाले, "या किटच्याद्वारे कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तीच्या श्वासोच्छवासावरुन कोरोनाचा अंदाज घेता येणार आहे. या कीटच्या माध्यमातून कोरोना विषाणूच्या न्युक्लिक अॅसिड अम्लाची पातळी पाहता येणार आहे." तसेच, 'ViraGen' हे  सिप्ला कंपनीची तिसरी कोविद - 19 टेस्टिंग कीट आहे. या कीटला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून मान्यता मिळाली आहे.   

 

 

संबंधित बातम्या