दिल्लीत शाळांना टाळे

दिल्लीत शाळांना टाळे
In the city of Delhi schools close in corona period


नवी दिल्ली :   कोरोना वाढण्याची भीती लक्षात घेता सर्व सरकारी आणि खासगी शाळा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा दिल्ली सरकारने केली आहे. याआधी ३१ ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले होते. मात्र, पालक आणि शिक्षकांकडून मिळालेल्या अभिप्रायानंतर पुढील आदेशापर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज सांगितले.

दिल्लीमध्ये मागील २४ तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे ४ हजार ८५३ कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर ४४ जणांनी प्राण गमावले आहेत.  मागील काही आठवड्यांपासून राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात वायुप्रदूषण वाढले आहे. श्वसनाच्या तक्रारी, डोकेदुखी, डोळ्यांमध्ये जळजळ यासारखे आजार वाढले आहेत. 

शाळा सुरू झाल्यास कोरोनाची लागण होण्याची विद्यार्थी, पालकांमधील भीती पाहता पुढील आदेशापर्यंत राजधानी दिल्लीतील शाळा बंद राहतील, असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com