Justice D. Y. Chandrachud: वडिलांनंतर आता मुलगाही होणार भारताचा सरन्यायाधीश

पुढील सरन्यायाधीपदासाठी यु. यु. लळित यांनी केली डी. वाय. चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस
Justice Y. V. Chandrachud And Justice D. Y. Chandrachud
Justice Y. V. Chandrachud And Justice D. Y. Chandrachud Dainik Gomantak

Justice D. Y. Chandrachud: न्या. धनंजय यशवंत तथा डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे 50 वे सरन्यायाधीश असतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सरन्यायाधीश यु. यु. लळित यांनी पुढील सरन्यायाधीशपदासाठी चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केंद्रीय कायदामंत्री किरन रिजिजू यांच्याकडे केली आहे.

Justice Y. V. Chandrachud And Justice D. Y. Chandrachud
SSC Scam: टीएमसी आमदार माणिक भट्टाचार्य यांना शिक्षक भरती घोटाळ्यात अटक

डी. वाय. चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी देखील देशाचे सरन्यायाधीशपद भुषविले आहे. 22 फेब्रुवारी 1978 ते 11 जुलै 1985 पर्यंत जवळपास 7 वर्षे त्यांचा सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ होता. वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर 37 वर्षांनी आता डी. वाय. चंद्रचूड हे त्याच पदावर विराजमान होतील.

सरन्यायाधीश म्हणून दोन वर्षांचा कालावधी मिळणार

डी. वाय. चंद्रचूड यांना सरन्यायाधीश म्हणून 2 वर्षांचा कालावधी मिळणार आहे. 9 नोव्हेंबर 2022 ते 10 नोव्हेंबर 2024 असा त्यांचा कार्यकाळ असेल. सरन्यायाधीश लळित हे 8 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतरच्याच दिवशी म्हणजे 9 नोव्हेंबर 2022 रोजी डी. वाय. चंद्रचूड हे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. लळित यांनी त्यांच्या पत्राची एक प्रत मंगळवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या उपस्थितीत न्या. चंद्रचूड यांनाही दिली.

Justice Y. V. Chandrachud And Justice D. Y. Chandrachud
PM मोदींनी 'या' व्यक्तीला भेटण्यासाठी तोडले सुरक्षा कवच, पाहा व्हिडीओ

यापुर्वी कायदा मंत्री किरन रिजिजू यांनी 7 ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश लळित यांना चिठ्ठी लिहून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचे नाव सुचविण्याबाबत पत्र लिहिले होते. सध्याच्या परंपरेनुसार सरन्यायाधीश कायदा मंत्रालयाच्या आवाहनानंतर आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस करत असतात.

न्या. डी. वाय. चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयात येण्यापुर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. मुंबई उच्च न्यायालयातही त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केले आहे. जगभरातील विद्यापीठात त्यांची भाषणे झालेली आहेत. न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यापुर्वी त्यांनी देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून काम केले आहे. शबरीमाला, भीमा कोरेगाव, समलैंगिकता, आधार आणि अयोध्या या प्रकरणात त्यांनी न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com