100, 10 आणि 5 रूपयांच्या जुन्या नोटा बंद होण्याचा दावा खोटा; पीआयबीने दिलं स्पष्टीकरण

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

“आरबीआयकडून मार्च २०२१ पासून 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात येणार आहेत, असा दावा वृत्तामध्ये केला जात आहे, मात्र अद्याप कोणतेही अधिकृत विधान प्रसिद्ध झाले नाही या वृत्तांमध्ये कोणतेही तथ्य नाही,”

100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याबाबत आरबीआयने महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. मागील आठवड्यात अनेक माध्यमांमध्ये या नोटा बंद करण्यात येणार असल्याचे वृत्त झळकले होते. सोशल मीडियावर देखील अशा बातम्यांचे अनेक स्क्रिनशॉट्स, मेसेज आणि पोस्ट व्हायरल झालेले दिसले. शेवटी या सगळ्या प्रकरणाची दखल घेत भारत सरकारच्या पत्रसूचना विभागाने (पीआयबी) या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

“आरबीआयकडून मार्च २०२१ पासून 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात येणार आहेत, असा दावा वृत्तामध्ये केला जात आहे, मात्र अद्याप कोणतेही अधिकृत विधान प्रसिद्ध झाले नाही या वृत्तांमध्ये कोणतेही तथ्य नाही,” असे पीआयबीकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय, “आरबीआयकडून या संदर्भातील कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही” असेही पीआयबीने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे असिस्टंट जनरल मॅनेजर बी महेश यांनी स्पष्ट केले आहे. ‘पीआयबी फॅक्ट चेक’ या ट्विटर अकाउंट च्या माध्यमातून  ही माहिती दिली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे असिस्टंट जनरल मॅनेजर बी महेश यांनी एका कार्यक्रमात सांगितले की मार्च-एप्रिलनंतर या सर्व जुन्या नोटा चालु राहणार आहेत. ते म्हणाले की, 'आरबीआय जुन्या चलनातील 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा हळूहळू काढून टाकेल. पण, अद्याप कोणतेही अधिकृत विधान या नोटांबाबत प्रसिद्ध झाले नाही, म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. जुन्या चलनातील नोटा मागे घेणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे.'

मतदार राजा..जागा हो ! मतदारांना जागविणारा ‘मतदार दिन’ -

पीआयबी फॅक्ट चेक केंद्र
सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या या नोटाबाबतच्या खोट्या बातम्यांसंदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी पीआयबीने ‘पीआयबी फॅक्ट चेक’ या नावाने एक ट्विटर अकाऊंट सुरु केलं आहे. या अकाऊंटवरुन सोशल मिडियीवर व्हायरल होणाऱ्या बातम्यांची सत्यता पडताळून स्पष्टीकरण दिले जाते. सरकारच्या पॉलिसी, योजना,  विभाग आणि मंत्रालयांविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी कार्य पीआयबी फॅक्ट चेक केंद्र करते. पीआयबी फॅक्ट चेकची मदतीने सरकार संबंधित बातम्यांची विश्वासार्हता जाणून घेतली जाऊ शकते. कोणताही सामान्य नागरिक PIB Fact Check ला संशयास्पद बातमीची माहिती, स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा य़ूआरएललिंक 918799711259 या व्हॉट्सअप नंबर वर पाठवू शकते. सोबतच pibfactcheck@gmail.com या ईमेल आयडीवर मेलही करु शकते.

 

 

संबंधित बातम्या