नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

25 फेब्रुवारीला ब्रिटनच्या न्यायालयाने नीरव मोदीला भारताकडे सोपवण्याचा निर्णय दिला होता.

पंजाब नॅशनल बॅंक घोटाळा प्रकरणामधील मुख्य आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्याला भारताकडे सोपवण्यास इंग्लंडच्या गृहमंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. सीबीआयने यासंबंधीची माहिती दिली आहे. नीरव मोदी पंजाब नॅशनल बॅंकमध्ये घोटाळा करुन 2018 मध्ये भारतातून फरार झाला होता. त्याला मार्चमध्ये लंडनमधून अटक करण्यात आली होती, तेव्हापासून तो लंडनमधील वॉंडसवर्थ तुरुंगात आहे. भारताने नीरव मोदीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. हे प्रकरण त्यानंतर न्यायालयामध्ये गेले होते. 25 फेब्रुवारीला ब्रिटनच्या न्यायालयाने नीरव मोदीला भारताकडे सोपवण्याचा निर्णय दिला होता.

14 हजार कोटीच्या पंजाब नॅशनल बॅंक घोटाळा प्रकरणामध्ये नीरव मोदी हा मुख्य आरोपी आहे. मुंबईच्या विशेष न्यायालयाने नीरव मोदीला फरारी म्हणून घोषीत केले होते. विजय मल्ल्यानंतर नीरव मोदी हा दुसरा व्यवसायिक आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार फरारी आर्थिक गुन्हेगार घोषीत करण्यात आला. न्यायालयाच्या निर्णयानंतर मोदी याच्या देशातील त्याचबरोबर देशाबाहेरील संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. (Clear the way to bring Nirav Modi to India)

अजय सेठ:  अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे नवे सचिव

पंजाब नॅशनल बॅंकेतून नीरव मोदी अनधिकृतरित्या लेटर ऑफ अंडरटेकिंग मिळवून बॅंकेच्या विदेशी शाखामधून अल्पमुदतीचे कर्ज मिळवून विक्रेत्यांची रक्कम चुकती करत असत. हे एलओयू म्हणजे कर्ज हवे असलेल्या व्यक्तीच्या योग्यतेची म्हणजे त्याने त्या बदल्यात उचलेल्या कर्जाची पंजाब नॅशनल बॅंकेने दिलेली हमीच होती. बॅंकेतील भ्रष्ट अधिकाऱ्याकडून मन मानेल तसे तो पत्र मिळवत आणि त्या बदल्यात भारतीय बॅंकाच्या विदेशी शाखेतून कर्ज उचल करुन विक्रेत्यांना पैसे देत असत.
 

संबंधित बातम्या