भारतीयांना वेड सेल्फिचे

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

मोबाईलमधून सेल्फी काढणे आणि ती लगेचच इतरांना ‘शेअर’ करणे हा भारतीय महिलांच्या आयुष्याचा मोठा भाग बनला असून त्याचा त्यांच्या वर्तणुकीवर आणि आर्थिक व्यवहारांवरही परिणामही होऊ लागला असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणात आढळून आला आहे.

वॉशिंग्टन: मोबाईलमधून सेल्फी काढणे आणि ती लगेचच इतरांना ‘शेअर’ करणे हा भारतीय महिलांच्या आयुष्याचा मोठा भाग बनला असून त्याचा त्यांच्या वर्तणुकीवर आणि आर्थिक व्यवहारांवरही परिणामही होऊ लागला असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणात आढळून आला आहे. सेल्फी काढून विविध ॲपच्या साह्याने त्यात बदल करण्याचा प्रकारही भारत आणि अमेरिकेत लोकप्रिय असल्याचे निदर्शनास आले आहे. 

जागतिक पातळीवर घेतलेल्या या सर्वेक्षणानुसार, कॅमेरा ॲपमधील फिल्टरचा लहान मुलांवर होणाऱ्या परिणामांबाबत भारतीय पालक फारसे काळजी करत नसल्याचे दिसून आले आहे. जर्मनीत मात्र पालक याबाबत सजग असतात. सेल्फीसह कोणत्याही छायाचित्राला अधिक चांगले रुप देण्यासाठी फिल्टरचा वापर दक्षिण कोरियात सर्रास केला जातो. सेल्फी क्लिक करण्यात आणि शेअर करण्यात भारतीय पटाईत असून फिल्टरचा वापर करून आपण स्वत:ला जगासमोर अधिक सुंदर स्वरुपात दाखवू शकतो, असे त्यांना वाटते. विशेषत: भारतीय महिला स्वत:ची छबी अधिक सुंदर करण्याकरता फिल्टरचा वापर करण्यास अधिक उत्साही असतात. मनासारखे छायाचित्र तयार करण्यासाठी त्या अनेक प्रकारच्या ॲपचा वापर करतात. या सवयीचा काही भारतीय महिलांच्या वर्तणुकीवर परिणाम होत असून पैसाही खर्च होत आहे. एखादा ड्रेस परिधान करून सेल्फी काढल्यास पुन्हा त्याच ड्रेसवर सेल्फी काढण्यास अनेक महिला तयार नसतात आणि त्या नवीन कपडे खरेदी करतात, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. 

    भारतीयांबाबत काही निष्कर्ष

  •     ७० टक्के छायाचित्रे अँड्रॉइड मोबाईलच्या फ्रंट कॅमेराद्वारे
  •     लहान मुलांकडून कॅमेराॲपचा अतिवापर होत असला  तरी दुर्लक्ष
  •     ॲपच्या अतिवापरापेक्षा मुलांकडून स्मार्टफोनचे नुकसान होऊ नये याची       काळजी
  •     मोबाईलच्या कॅमेराचा दर्जा ही महत्त्वाची बाब

संबंधित बातम्या