Uttarakhand: उत्तराखंडमध्ये ढगफुटी, वैष्णोदेवी यात्रेला ब्रेक, Video

उत्तराखंडमधील डेहराडून जिल्ह्यातील रायपूर ब्लॉकमध्ये शनिवारी पहाटे ढगफुटीची घटना घडली आहे.
Uttarakhand
Uttarakhand Dainik Gomantak

Uttarakhand: डेहराडून जिल्ह्यातील रायपूर ब्लॉकमध्ये शनिवारी पहाटे ढगफुटीची घटना घडली आहे. आज पहाटे 2.45 वाजता जिल्ह्यातील सरखेत गावात ढगफुटी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. माहिती मिळताच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचले. "गावात अडकलेल्या सर्व लोकांची सुटका करण्यात आली आहे, तर काहींनी जवळच्या रिसॉर्टमध्ये आश्रय घेतला आहे," असे पथकाने सांगितले.

दरम्यान, "कालपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे डेहराडूनमधील प्रसिद्ध टपकेश्वर महादेव मंदिराजवळून वाहणाऱ्या तमसा नदीला पूर आला. माता वैष्णोदेवी गुहा योग मंदिर आणि टपकेश्वर महादेव यांच्यातील संपर्क तुटला आहे. मंदिराचे संस्थापक आचार्य बिपीन जोशी म्हणाले, " देवाची कृपा, कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही."

नद्या-नद्यांनी उग्र रूप धारण केले आहे

डेहराडूनमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे टपकेश्वर महादेव मंदिराजवळून वाहणाऱ्या तमसा नदीने शनिवारी उग्र रूप धारण केले. तसेच माता वैष्णोदेवी गुहा योग मंदिर टपकेश्वर महादेव यांचा संपर्क तुटला असून पुन्हा मंदिराचे आणि जवळपासचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे सांग नदीच्या पाणी पातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आणि त्याचवेळी नैनिताल जिल्ह्यामध्ये रामनगर आणि त्याच्या आसपासच्या नद्या उग्र रूप धारण करू लागल्या आहेत.

रस्ते, महामार्ग आणि डोंगरावरील संकट धोकादायक बनले

अनेक रस्ते आणि पूल कोसळण्‍यासोबतच डोंगराजवळही वाईट परिस्थिती निर्माण होत आहे. चंपावत येथील पावसामुळे स्वाला-आमोडी दरम्यानचा टनकपूर ते चंपावत महामार्ग डोंगरावरून दगड पडल्याने शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून ठप्प झाला होता तसेच महामार्ग बंद झाल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा प्रवासी अडकून पडले.

उत्तरकाशीतील गंगोत्री-यमुनोत्री महामार्गही काल संध्याकाळी डोंगरावरून पडलेल्या दगडांमुळे बंद झाला होता तो आता खुला करण्यात आला, मात्र काही वेळाने हा महामार्ग पुन्हा बंद करावा लागला असल्याचे सांगितले जात आहे. यमुनोत्री महामार्ग 48 तासांहून अधिक काळ ठप्प आहे असल्याचेही समोर येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com