कुख्यात गॅंगस्टर छोटा राजन कोरोनाच्या विळख्यात

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 24 एप्रिल 2021

छोटा राजनला कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यातच तिहार तुरुंगात (Tihar Jail) शिक्षा भोगत असलेला गॅंगस्टर छोटा राजन (Chota Rajan) याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर तिहार तुरुंगातील रुग्णालयामध्ये  उपचार सुरु असल्याचं तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. छोटा राजनला कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये राजनला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर तैनात असलेल्या जवानांना होम क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं आहे. (In the clutches of notorious gangster Chhota Rajan Corona)

हद्द झाली! लस चोरीनंतर चक्क लिक्विड ऑक्सिजनचा टँकर झाला गायब

याआगोदर बिहारचा माजी खासदार शहाबुद्दीन यालाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. तिहार तुरुंगातील तुरुंग क्रमांक दोनमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर छोटा राजनमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामुळे अन्य कैद्यांना वेगळं ठेवण्यात आलं आहे, असं तिहार तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

मुंबईमधील (Mumbai) सीबीआयच्या (CBI) विशेष न्यायालयाने जानेवारी महिन्यामध्ये गॅंगस्टर छोटा राजनला खंडणी प्रकरणी दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. पनवेलमधील बांधकाम व्यवसायिकाकडे 26 कोटींची खंडणी मागितली होती. राजनला यापूर्वी दिल्लीमधील बनावट पासपोर्ट प्रकरणातही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
 

संबंधित बातम्या