कर्नाटकात ७ जूननंतर टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

दैनिक गोमंतक
मंगळवार, 25 मे 2021

टास्कफोर्सचे (Taskforce) अध्यक्ष डॉ एस सच्चिदानंद म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट जूनच्या शेवटापर्यंत ओसरण्याची शक्यता आहे. तरी आत्ताची परिस्थिती पाहता असे दिसत आहे  ही लाट लवकर कमी होऊ शकते.

कर्नाटक सरकार (Karnataka Government) 7 जूननंतर लॉकडाउनमध्ये (Lockdown) शिथिल करु शकते. जर येणाऱ्या दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली नाही तर सरकार हळूहळू अनलॉक (Unlock) करु शकते. माध्यमांना (Media) मिळालेल्या माहिती नुसार कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी अधिकाऱ्यांना हळूहळू लॉकडाउन शिथिल करण्यासाठी राेड मॅप तयार करण्यास सांगितला आहे.  ही अनलॉकिंगची प्रक्रिया 3 ते 4 टप्प्यात होणार आहे. 

टास्कफोर्सचे (Taskforce) अध्यक्ष डॉ एस सच्चिदानंद म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट जूनच्या शेवटापर्यंत ओसरण्याची शक्यता आहे. तरी आत्ताची परिस्थिती पाहता असे दिसत आहे  ही लाट लवकर कमी होऊ शकते. अनलॉकची प्रक्रिया मागिल वर्षी प्रमाणेच होईल. लोकांना नियमांचे पालन करणे बंधन कारक असेल त्यामुळे संक्रमण रोखण्यास मदत होईल.

 महाराष्ट्र सरकार लॉकडाऊन हटवणार?  

बंगळूरात 1 ते 7 मे पर्यंत होता. विश्लेषणानंतर एकगोष्ट समोर आली आहे, 27 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत  बंगळूरमध्ये 16,893 केसेस समोर आल्या होत्या. या  24 ते 30 एप्रिल दरम्यान ही संख्या वाढून 1 लाख 41 हजार 115 इतकी झाली तर 1 ते 7 मे या कालावधीत 1 लाख 51 हजार 722 केसेस समोर आल्या होत्या. कर्नाटक चे उपमुख्यमंत्री सीएन अश्वथ नारायण यांनी सांगितले, येणाऱ्या काळात कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता आपल्या आरोग्य सुविधेत सुधार करण्याची गरज आहे. त्यामुळे सध्या तरी लॉकडाउन उठविण्याच्या बाबतीत विचार करणे घाईचे ठरेल. 

संबंधित बातम्या