कोब्रा कमांडो दलाचे जवान राकेश्वर सिंह मनहास यांची अखेर सुटका 

कोब्रा कमांडो दलाचे जवान राकेश्वर सिंह मनहास यांची अखेर सुटका 
rakeshwar singh.jpg

छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर कोब्रा कमांडो दलाचे जवान राकेश्वर सिंह मनहास यांना नक्षलवाद्यांनी सोडले आहे. शनिवारी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर ते बेपत्ता होते. राकेश्वर सिंह हे आपल्या ताब्यात असल्याचा दावा नक्षलवाद्यांनी केला होता. त्यानंतर आज त्यांची सुटका करण्यात आली आहे. राकेश्वर सध्या टेरिममधील 168 व्या बटालियनच्या छावणीत असून त्यांची वैद्यकीय तपासणी तेथे केली जात आहे.  त्यांना नक्की कधी आणि कसे सोडण्यात आले, त्यांच्यासोबत सोबत कोणकोपण होते याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (Cobra Commando jawan Rakeshwar Manhas finally released) 

शनिवारी कोब्रा कमांडो दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर राकेश्वर सिंह अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर काही नक्षलवाद्यांनी सोमवारी बिजापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश मिश्रा आणि पत्रकार राजा राठोड या दोन स्थानिक पत्रकारांना फोन करुन राकेश्वर सिंह आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला होता. 3  एप्रिल रोजी झालेल्या या चकमकीत  एकूण 22  जवान यात हुतात्मा झाले. त्यात  केंद्रीय राखीव पोलिस दलाचे आठ जण असून कोब्रा कमांडो दलाचे 7  कमांडो, विशेष कृती दलाचे 6  तर जिल्हा राखीव दलाचे 8 जण यांचा समावेश आहे. एक जवान बेपत्ता आहे.

तर नक्षलवाद्यांनीही त्यांच्या पाच साथीदारांना मारले गेल्याची कबुली दिली. तर चकमकीच्या वेळी माओवाद्यांनी सीआरपीएफचा कोब्रा कमांडर राकेश्वर सिंह यांचे अपहरण केले. यानंतर, माओवाद्यांचे प्रवक्ते ऑप्शन यांनी मंगळवारी एक प्रेस नोट जारी केली होती .  प्रथम सरकारने वाटाघाटीसाठी मध्यस्थ व्यक्तीचे नाव जाहीर करावे, त्यानंतर त्यांच्याबरोबर राहणारा जवान त्यांना सुपूर्द केला जाईल. तोपर्यंत तो त्यांच्या संरक्षणाखाली सुरक्षित राहील, असे नक्षलवाद्यांनी कळवले होते. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com