लौट आया भारत का 'Vikrant', स्वदेशी विमानवाहू नौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द

INS Vikrant: कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) ने गुरुवारी स्वदेशी बनावटीची विमानवाहू नौका विक्रांत नौदलाकडे सुपूर्द केली आहे.
Vikrant
VikrantDainik Gomantak

COCHIN SHIPYARD LIMITED: कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) ने गुरुवारी स्वदेशी बनावटीची विमानवाहू नौका 'विक्रांत' नौदलाकडे सुपूर्द केली आहे. त्याची रचना नौदलाच्या इंटिरिअर डायरेक्टरेट ऑफ नेव्हल डिझाईनने केली आहे. भारतीय नौदलाला सोपविण्यात आलेली ही देशातील पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू वाहक (IAC-1) आहे. 1971 च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय नौदल जहाज (INS) विक्रांतच्या नावावरुन हे नाव देण्यात आले आहे. ऑगस्टमध्ये अधिकृतपणे नौदलात सामील होऊ शकते.

दरम्यान, संरक्षण प्रकाशनात म्हटले आहे की, 'IAC च्या समावेशामुळे हिंद महासागर क्षेत्रात (IOR) देशाची स्थिती आणखी मजबूत होईल. CSL ने एका प्रसिद्धीपत्रकात विमानवाहू जहाज सुपूर्द केल्याची पुष्टी केली आहे. ही भारतातील (India) आतापर्यंतची सर्वात मोठी युद्धनौका आहे. त्याचे वजन सुमारे 45,000 टन आहे. तो देशातील सर्वात महत्वाकांक्षी नौदल जहाज प्रोजेक्ट देखील आहे.'

Vikrant
Punjab Police: पाकिस्तानी ड्रोनमधून टाकलेले 5 किलो हेरॉईन जप्त

दुसरीकडे, IAC च्या बांधणीत एकूण 76 टक्के स्वदेशी बनावटीचे साहित्य वापरण्यात आले आहे, जे देशाच्या 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेचे उत्तम उदाहरण आहे. त्याचबरोबर सरकारच्या (Government) 'मेक इन इंडिया' उपक्रमाला चालना देते, असे प्रकाशनात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com