Indian Navy War Ship: कोचीनमध्ये तयार होतेय महाविनाशक युद्धनौका, क्षणार्धात शत्रूचा नाश करेल!

Indian Navy War Ship: जहाज उत्पादक कंपनीने सांगितले की, या जहाजांचा पुरवठा मार्च 2027 पासून सुरु होईल.
Indian Navy War Ship
Indian Navy War ShipDainik Gomantak

Next Generation Missile Ships: कोचीन शिपयार्ड लिमिटेड (Cochin Shipyard limited) ने भारतीय नौदलासाठी 9805 कोटी रुपये खर्चून सहा नेक्स्ट जनरेशन मिसाईल वेसेल्स (NGMV) बांधण्यासाठी महत्त्वपूर्ण करार केला आहे.

2027 पासून या जहाजांचा पुरवठा केला जाईल. "शत्रूच्या युद्धनौका, व्यापारी जहाजे आणि जमिनीवरील लक्ष्यांवर लढाऊ क्षमता प्रदान करणे ही जहाजांची प्राथमिक भूमिका असेल," असे सरकारी मालकीच्या कोचीन शिपयार्डने एका प्रकाशनात म्हटले आहे.

शत्रूच्या जहाजांविरुद्ध

जहाज (Ship) उत्पादक कंपनीने सांगितले की, या जहाजांचा पुरवठा मार्च 2027 पासून सुरु होईल. एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, 'एनजीएमव्ही ही एक युद्धनौका असेल, जी अशा प्रकारची अतिवेगवान आणि जलद फायरपॉवरच्या शस्त्रांनी सुसज्ज असेल, जी रडारच्या नजरेत धूळ झोकण्यातही सक्षम असेल.

विशेष म्हणजे, ही युद्धनौका शत्रूच्या जहाजांविरुद्ध समुद्रातील शक्तिशाली शस्त्र सिद्ध होईल.'

Indian Navy War Ship
Indian Navy: आता शत्रूंची खैर नाही! नौदलाने युद्धनौकेवरून हवाई क्षेपणास्त्राची केली यशस्वी चाचणी, Watch Video

तसेच, कोचीन शिपयार्ड लिमिटेडचे ​​मुख्य व्यवस्थापकीय संचालक मधु एस नायर म्हणाले की, देशातील पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू वाहक INS विक्रांत यशस्वीरित्या तयार केल्यानंतर, शिपयार्ड NGMV बांधण्याचे काम हाती घेण्यास उत्सुक आहे.

ही क्षेपणास्त्र (Missile) जहाजे अतिवेगवान आणि धोकादायक शस्त्रांनी सुसज्ज असतील. ही जहाजे समुद्रात आणि जमीनीवर लढण्यास सक्षम असतील.

देशाचे नौदल देखील या जहाजांचा वापर देशाच्या किनारी भागाच्या निगराणी आणि सुरक्षेसाठी करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com