COWIN पोर्टलवरुन लसीकरणाच्या नोंदीसाठी 'हा' कोड आवश्यक; जाणून घ्या

cowin
cowin

जगात सर्वात मोठी लसीकरण (Vaccine) मोहीम भारतात सुरू आहे. या लसीकरण मोहिमेत लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन करताना कोणाला काही अडचण येत असेल तर कोविन पोर्टल (CoWin Portal) वर एक खास नवीन फीचर सरकारद्वारे जोडले गेले आहे. काही वापरकर्त्यांच्या तक्रारीनंतर पोर्टलवर लसीकरण सर्टिफिकेट (Vaccination Certificate) जनरेट होत आहे. या प्रॉब्लेमला संपवण्यासाठी आता वापरकर्त्यांना एक सिक्योरिटी कोड पाठवले जात आहे. आता या कोडविना कोविन पोर्टलवरून लस बुक करणाऱ्यांना लस दिली जाणार नसल्याचे त्यात म्हटले आहे. लस घेण्याच्या अगोदर हा कोड दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. (Code required for vaccination registration)

यासाठी केला बदल  
केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health and Family Welfare) ने सांगितले, काही लोकांच्या तक्रारी होत्या की, लसीकरणासाठी अपॉइंटमेंट घेतली होती. परंतु, वेळेत लस घेण्यासाठी पोहोचलो नाही. परंतु, एसएमएस द्वारे त्यांना सांगितले की, त्यांचा लसीचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. या अशा तक्रारीनंतर कोविन पोर्टलला एक नवीन फीचर जोडले गेले आहे. आता लसीकरण केंद्रावर लस टोचण्यासाठी जाताना हा चार आकडी कोड विचारला जाईल. त्यानंतर तो कोड लसीकरणाच्या ठिकाणी सबमिट केला जाईल. त्यानंतर लसीची पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल.

कोवीन पोर्टलवर कोविड लसीकरणासाठी अशी घ्या अपॉइंटमेंट  
>> सर्वात आधी सर्च ब्राउजरमध्ये जाऊन cowin.gov.in संकेतस्थळ ओपन करा.
>> आता स्क्रीनवर वरच्या बाजुला Register/Sign In yourself लिहिलेले असेल. त्यावर क्लिक करा.
>> आता यानंतर Register or SignIn for Vaccination च्या खाली आपला दहा अंकी मोबाइल नंबर टाका.
>> आता यानंतर एक ओटीपी जनरेट होईल.
>> योग्य ओळखपत्रांची माहिती त्यात भरा. लसीकरणाला जाताना ते ओळखपत्र सोबत घेऊन जा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com