केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोक, पेप्सीको, बिस्लेरी कंपनीवर 72 कोटींचा दंड

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) कोक, पेप्सीको आणि बिस्लेरी च्या प्लास्टिक कचरा विल्हेवाट लावण्यासंबंधीची माहिती सरकारी संस्थेकडे संकलन न केल्याबद्दल कडक दंड ठोठावला आहे.

नवी दिल्ली: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) कोक, पेप्सीको आणि बिस्लेरी च्या प्लास्टिक कचरा विल्हेवाट लावण्यासंबंधीची माहिती सरकारी संस्थेकडे संकलन न केल्याबद्दल कडक दंड ठोठावला आहे. या कंपन्यांना सुमारे 72 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. सीपीसीबीने बिस्लेरीवर 10.75 कोटी रुपयाचा दंड ठोठावला आहे, पेप्सीको इंडियावर 8.7 कोटी रुपये आणि कोका-कोला बेव्हरेजवर 50.66 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

त्याचबरोबर बाबा रामदेव यांच्या पतंजली वर देखील करोडो रूपयाचा दंड ठोठावला आहे. कोक, पेप्सिको आणि बिस्लेरी व्यतिरिक्त, बाबा रामदेव याच्या पतंजली कंपनी वर देखील दंड ठोठावला आहे. पतंजलीवर एक कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. याचबरोबर एका दुसर्‍या कंपनीला 85.9 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. 

 

 

संबंधित बातम्या