येत्या तीन दिवसात देशात वाढणार थंडीचा कहर

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

हिमवृष्टीमुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या भागात मोठ्या प्रमाणात तापमानाचा पारा खाली घसरला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उत्तर व मध्य भारतातील काही भागांत थंडी वाढण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे.

नवी दिल्ली : रविवारी झालेल्या हिमवृष्टीमुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या भागात मोठ्या प्रमाणात तापमानाचा पारा खाली घसरला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उत्तर व मध्य भारतातील काही भागांत थंडी वाढण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात आपल्या शेतात सिंचनासाठी जाणाऱ्या एका 45 वर्षीय शेतकऱ्याचा थंडीमुळे मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली.

रविवारी हिमवृष्टीनंतर काश्मीरमध्ये बऱ्याच ठिकाणी तापमानात घट झाली. हिमाचल प्रदेशातील कुफरी, भरमौर, किलाँग आणि कल्पा या भागांमध्ये जोरदार हिमवृष्टी झाली. श्रीनगर आणि काझीगुंड वगळता रात्री काश्मीर खोऱ्यातील तापमान खाली गेले असल्याचे हवामान खात्याने सांगितले. दरम्यान, राज्यातील काही भागांत हलक्या स्वरुपाचा पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्याकडूनच प्राप्त झाली आहे.

100, 10 आणि 5 रूपयांच्या जुन्या नोटा बंद होण्याचा दावा खोटा; पीआयबीने दिलं स्पष्टीकरण -

श्रीनगर शहरात उणे 1. 9 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले, आदल्या रात्री उणे २ अंश सेल्सिअसपेक्षा किंचित वाढ झाली उत्तर प्रदेशातून वारे वाहू लागल्यामुळे येत्या तीन दिवसांत मध्य प्रदेशात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असल्याचे आयएमडी अधिकाऱ्यांनी सांगितले.

शिमला हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार किलाँगमध्ये 15 सेंटीमीटर हिमवृष्टी झाली. कर, कल्पामध्ये 4.6 सेमी, कुफरी येथे 2 सेमी हिमवृष्टी झाली. सोबतच कांगडा 25.4 मिमी, चंबा 20 मिमी, पालमपूर, 17 मिमी, धरमशाला 14.8 मिमी, मनाली 10 मिमी आणि शिमला 1.7 मिमी अशा स्वरुपात  पावसाचा सरी बरसल्याचेही सांगण्यात आले आहे.

सोमवारपासून ते पुढील तीन दिवसांपर्यंत तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता असून किमान तापमान  शुन्यापेक्षाही तीन ते पाच अंश सेल्शिअसपर्यंत खाली जाण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. जम्मू काश्मीर भागातही थंडीचा कडाका कायम राहणार आसल्याची माहिती आयएमडीच्या भोपाळ कार्यालयातील वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ पीके साहा यांनी दिली. राज्यात हिवाळ्याच्या हंगामात आतापर्यंत चारवेळा पावसाने हजेरी लावली आहे. . हिमवृष्टीमुळे आणि सासत वाढणाऱ्या शीतलहरीमुळे या भागातील  जनजीवन विस्तकळीत झाल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे.

राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातही  थंडीचा जोर वाढल्याची जाणीव होत आहे. नाशिक, परभणी, नागपूर, सोलापूर या भागांमध्ये देखिल वातावरणात गारवा जाणवत आहे.  मुंबई आमि उपनगरेही कडाक्याच्या थंडीने गारठली आहेत. येत्या काही दिवसात राज्यातील या भागांमध्ये हवामानात हदल होणार आहे. वातावरणातील थंडावा वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तेव्हा नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असेही सांगण्यात आले आहे.

 

 

संबंधित बातम्या