कडाकाच्या थंडीने उत्तर भारत अक्षरश: गारठले

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

उत्तर भारतामध्ये थंडीची तीव्र लाट आली असून उत्तरप्रदेश, राजस्थान,  हरियाणा आणि पंजाबसह अन्य राज्ये गारठली आहेत. राजस्थानातील सिकरमध्ये ४ अंश सेल्सिअस (अं.से) एवढ्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. 

नवी दिल्ली- उत्तर भारतामध्ये थंडीची तीव्र लाट आली असून उत्तरप्रदेश, राजस्थान,  हरियाणा आणि पंजाबसह अन्य राज्ये गारठली आहेत. राजस्थानातील सिकरमध्ये ४ अंश सेल्सिअस (अं.से) एवढ्या निचांकी तापमानाची नोंद झाली असून जम्मू- काश्‍मीरच्या काही भागांतील तापमान हे शून्याच्याही खाली गेले आहे. काश्‍मीर खोऱ्यातील ही स्थिती ख्रिसमसपर्यंत कायम राहू शकते असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

नंदनवनाची राजधानी असलेल्या श्रीनगरचा पारा उणे पाच (अं.से)पर्यंत खाली घसरला आहे. दक्षिण काश्‍मीरमधील पहलगाममध्येही तो उणे ५.८ (अं.से) पर्यंत खाली आला आहे. गुलमर्गमध्ये उणे सहा (अं.से) एवढ्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. 

हरियाणा आणि पंजाबमधील हिसार, आदमपूर आणि लुधियाना या भागांत थंडीची लाट अधिक तीव्र झाली आहे. हरियानाच्या हिसारचा पारा २.७ (अं.से) पर्यंत खाली आला आहे. आदमपूर आणि लुधियानामध्येही तीव्र थंडी होती.

संबंधित बातम्या