तरुणाच्या कानाखाली मारणाऱ्या 'कलेक्टरला मुख्यमंत्र्यांनी केलं निलंबित'; बघा काय आहे प्रकरण

दैनिक गोमंतक
रविवार, 23 मे 2021

कानशिलात लगावून, युवकाच्या हातातील फोन हिसकावत तो जमिनीवर फेकत असल्याचा कलेक्टर रणबीर शर्मांचा (Collector Ranbir Sharma) एक व्हिडीओ समोर आला आहे.

लॉकडाऊन (Lockdwon) काळात विनाकारण बाहेर पडलेल्या लोकांना पोलीस (Police) लाठीचा प्रसाद देतानाच अनेक व्हिडीओ  व्हायरल (Viral Video) होत असतात. यातील काही ठिकाणी पोलीस दंडुकेशाही करत असताना देखील दिसतात. त्यामुळे नाकरिकाना देखील नाहक त्रास सहन करावा लागतो. अशीच एक घटना छत्तीसगडमध्ये देखील घडली. मात्र या घटनेत कलेक्टरला एका युवकाच्या कानाखाली मारणे (Collector Slamming A Person) महागात पडले असल्याचे समजते आहे. (Collector Ranbir Sharma was Suspended by Chief Minister Bhupesh Baghel)

छत्तीसगडच्या सुरजपूर जिल्ह्याचे कलेक्टर  रणबीर शर्मा (Collector Ranbir Sharma) यांना एका युवकाला कानाखाली  मारणे आणि फोन तोडणे महागात  पडले आहे. लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरणाऱ्या एका युवकाला सुरजपूरचे कलेक्टर रणबीर  शर्मा यांनी विचारपूस करताना कानशिलात लगावली, आणि त्या युवकाच्या हातातील फोन हिसकावत तो जमिनीवर फेकत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर गंभीर प्रतिक्रिया उमटल्या असून एखाद्या औषधी आणण्यासाठी जात असलेल्या युवकाला मारहाण झाल्याने लोकांनी या कृत्याचा निषेध केला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मुख्यमंत्री यांनी कारवाई करत कलेक्टर रणबीर शर्मा यांना पदावरून हटवण्यात आल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 

मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी "सुरजपूरचे कलेक्टर  रणबीर शर्मा यांनी एका युवकाशी गैरवर्तन केल्याचे प्रकरण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या निदर्शनास आले. ही गोष्ट अत्यंत निंदनीय असून छत्तीसगडमध्ये अशा प्रकारचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे कलेक्टर रणबीर शर्मा याना तात्काळ पदावरून हटवण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती दिली आहे.

रामदेव बाबांना 'ते' वक्तव्य भोवणार? IMA ने केंद्राकडे केली कारवाईची...

संबंधित बातम्या