राफेलसह अनेक नवीन शस्त्रांच्या एकत्रीतकरणाने आपली ताकद वाढली

चिनी हवाई दल (Chinese Air Force) अजूनही पूर्व लडाखमध्ये उपस्थित आहे. पण त्याचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही. गेल्या काही वर्षांमध्ये आमची लढाऊ क्षमता खूप वाढली आहे.
राफेलसह अनेक नवीन शस्त्रांच्या एकत्रीतकरणाने आपली ताकद वाढली
नवीन शस्त्रांच्या एकत्रीकरणामुळे आपली ताकद आधिक वाढली आहे. अशी माहिती आयएएफ चीफ एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी (Chief Air Chief Marshal VR Chaudhary) यांनी दिली आहे.Dainik Gomantak

चिनी हवाई दल (Chinese Air Force) अजूनही पूर्व लडाखमध्ये उपस्थित आहे. पण त्याचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही. गेल्या काही वर्षांमध्ये आमची लढाऊ क्षमता खूप वाढली आहे. राफेलच्या (Rafael) समावेशामुळे आमची लढाऊ क्षमता वाढली आहे. आमच्या ताफ्यात नवीन शस्त्रांच्या एकत्रीकरणामुळे आपली ताकद आधिक वाढली आहे. अशी माहिती आयएएफ चीफ एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी (Air Chief Marshal VR Chaudhary) यांनी दिली आहे.

आयएएफच्या 89 व्या वर्धापन दिनानिमित्त हवाई दलाकडून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चौधरी बोलत होते.

नवीन शस्त्रांच्या एकत्रीकरणामुळे आपली ताकद आधिक वाढली आहे. अशी माहिती आयएएफ चीफ एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी (Chief Air Chief Marshal VR Chaudhary) यांनी दिली आहे.
अफगाणिस्तानचा तालिबान्यांवर AIR STRIKE, 35 जणांना कंठस्नान

जम्मूमध्ये नुकत्याच झालेल्या ड्रोन हल्ल्याबाबत ते म्हणाले, ड्रोन हल्ला होण्याच्या 4 वर्षांपूर्वी, आम्ही आत्मनिर्भर भारतअंतर्गत, अँटीड्रोन क्षमता प्रणालीवर काम करण्यास सुरुवात केली आहे. ते देशातच बनवले जात आहे. अनेक स्टार्टअप्सना याची प्रणाली बनवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

नवीन शस्त्रांच्या एकत्रीकरणामुळे आपली ताकद आधिक वाढली आहे. अशी माहिती आयएएफ चीफ एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी (Chief Air Chief Marshal VR Chaudhary) यांनी दिली आहे.
भारत-चीन लष्करी चर्चेची 13 वी फेरी पुढील आठवड्यात?

आम्ही हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कडून 6 लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर मिळवण्याच्या मार्गावर आहोत. भारतातील सैन्याच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर सर्व प्रकारच्या हवामानात उडण्यास सक्षम आहे. हे 7000 किमी पेक्षा जास्त अंतर पार करू शकते आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय 17 दिवस सतत उड्डाण करू शकते. आमच्याकडे मिग -21 ची चार स्क्वाड्रन आहेत. पुढील तीन ते चार वर्षांत ड्रॉडाउन होईल. भारतीय हवाई दलासाठी ड्रोन विकसित करण्याच्या दृष्टीने आम्ही लवकरच स्टार्टअपना कंत्राट देऊ इच्छितो.

पीओके हवाई क्षेत्राबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही

पाकिस्तान आणि पीओके मधील हवाई क्षेत्रांच्या संदर्भात आम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. कारण त्या लहान पट्ट्या आहेत ज्यात फक्त काही हेलिकॉप्टर नेण्याची क्षमता आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत, आम्ही 18 देशांमधून वैद्यकीय पुरवठा आणि ऑक्सिजनची वाहतूक करण्याचे काम केले आहे. यामध्ये आमच्या हवाई दलाने सुमारे 1100 तास उड्डाण केले आणि भारतातच 2600 तास उड्डाण केले.

Related Stories

No stories found.