‘’आमच्या लग्नाला या, पण कोरोनाची चाचणी केली तरच..’’

‘’आमच्या लग्नाला या, पण कोरोनाची चाचणी केली तरच..’’
Come to our wedding but only if we test the corona

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ठरलेली सर्वच नियोजने विस्कटली आहेत. विवाह सोहळ्यामधून मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग पसरत असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे सरकारने लग्नामध्ये पाहुण्यांच्या येण्यावर बंधनं घातली आहेत. बंधनं म्हटलं की अनेकांनी ठरलेली लग्नं पुढे ढकलली आहेत. काही दिवसांमध्ये कोरोना संसर्ग आटोक्यात येईल याची अनेक जोडपी वाट पाहत आहेत. आता उत्तराखंडमधील एका जोडप्यानं यावर एक हटके पर्याय शोधून काढला आहे. नातेवाईकांना राग पण येणार नाही आणि लग्नातही कोणत्याही प्रकारचं विघ्न येणार नाही यासाठी एक युक्ती शोधली आहे. पुढच्या आठवड्यामध्ये लग्न असल्याने पाहुण्यांना कोरोना चाचणी करुन अहवाल आणण्याचं आवाहन जोडप्याने निमंत्रण पत्रिकेतून केलं आहे. (Come to our wedding but only if we test the corona)

‘कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देण्यात आलेली सर्व नियामावली लग्नात पाळली जाणार आहे. 18 एप्रिलला विजय आणि वैशाली यांचा विवाह टिका सोहळा हरिद्वार येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाला 18 जण उपस्थित राहणार आहेत. त्या सर्वांना आरटी-पीसीआर चाचणी करण्यास सांगितलं आहे. कार्यक्रमावेळी चाचणी अहवाल आणण्यास सांगितलं आहे. त्यानंतर 24 एप्रिल रोजी जयपूरमध्ये विवाह सोहळा पार पडणार आहे. यासाठी आम्ही नातेवाईकांना निमंत्रण पत्रिका दिली आहे. त्यात आरटी-पीसीआर चाचणी करण्याचं आवाहन केले आहे. त्याचबरोबर लग्नामध्ये मास्क आणि सॅनिटाझर बंधनकारक केले आहे. जेणेकरुन नियमावलीचे पालन करत लग्न सोहळ्याचा आनंद लुटता येईल, असं विजयचा लहान भाऊ अजयने सांगितलं आहे.

कोरोनाचा वाढता फैलाव पाहता आम्ही सर्व काळजी घेणार आहोत. लग्नात सरकारने सांगितल्याप्रमाणे आम्ही फक्त 50 माणसांना निमंत्रण दिले आहे. त्याच्यावर एकही माणूस आगाऊ नसेल. हे आम्ही सगळ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने करत आहोत, असंही त्याने पुढे सांगितलं. 

विवाह सोहळ्यात होणारी गर्दी आणि त्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे उत्तराखंडमधील दाम्पत्याने उचलेलं पाऊल वाखण्याजोगं आहे.
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com